
नागपूर! हॉटेल कर्मचाऱ्यांनी रुम नंबर 302 चे दार उघडलं अन् समोरचं दृष्य पाहून…
नागपूर : नागपुरातील मनीषनगर परिसरातील एका हॉटेलमध्ये युवतीची हत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. युवतीची हत्या करणाऱ्या आरोपीने स्वत:ला संपवण्याचा देखील प्रयत्न केला आहे. शिवानी गजभिये (वय २८) असे मृत युवतीचे नाव आहे. किरण आत्राम असे जखमी आरोपीचे नाव आहे. हॉटेलच्या रुमनंबर 302 मध्ये ही घटना घडली आहे.
आरोपी किरण आणि शिवानी हे दोघं हॉटेलमध्ये गेले होते. दोघंही रेल्वे कर्मचारी होते. रुम नंबर 302 मध्ये गेल्यावर देखील दोघांमध्ये भांडण झालं असावं, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मंगळवारी सुमारे साडे नऊच्या सुमारास रूममधून अचानक किंकाळ्या येऊ लागल्या. त्यानंतर हॉटेल स्टाफने चावीने रुमचा दरवाजा उघडला. रुम उघडून समोर पाहिल्यानंतर धक्का बसला.
View this post on Instagram
रूममध्ये दोघेही रक्तबंबाळ अवस्थेत पडले होते, तर बाजूलाच चाकू आढळून आला. आरोपी किरणने शिवानीची हत्या केली असावी, असा पोलिसांना संशय आहे. दोघांमधील वादानंतर किरणने शिवानीवर चाकूने हल्ला केला आणि त्यानंतर स्वतःलाही जखमी केल्याचा प्राथमिक संशय आहे. हॉटेल कर्मचाऱ्यांनी तातडीने पोलिसांना फोन केला आणि घटनेची माहिती दिली.
बेलतरोडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांनाही रुग्णालयात हलवले. पण वाटेतच शिवानीचा मृत्यू झाला असून किरणवर उपचार सुरू आहेत. बेलतरोडी पोलिस पुढील तपास करत आहेत.
नागपूर! प्रेयसीचा OYO हॉटेलमध्ये गळा चिरून हत्या…
नागपूर हादरलं! एकतर्फी प्रेमातून विवाहित शेजाऱ्याने युवतीला संपवलं अन्…
नागपूर! वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या मुलीचा फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह…
नागपूर हादरलं! चारित्र्याच्या संशयातून डॉक्टर पत्नीची डॉक्टर पतीने केली हत्या…
नागपूर दुहेरी हत्याकांडाने हादरलं; घरातील रॉडने हल्ला…

