पोलिस मुख्यालयात जाताना अपघातात महिला पोलिसाचा मृत्यू…

चंद्रपूर : चंद्रपूर-मूल मार्गावर दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात विशाखा बनसोड या महिला पोलिस शिपायाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पोलिस कर्मचारी वर्तुळात शोककळा पसरली आहे. तर बनसोड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल मार्गावरच्या वलनी- बोर्डा वळणावर ही दोन कारची समोरासमोर धडक झाली आहे. विशाखा बनसोड या नागभीड तालुक्यातील तळोधी-बाळापुर पोलिस ठाण्यात नुकत्याच रुजू झाल्या होत्या. जिल्हा पोलिस मुख्यालयात असलेल्या उजळणी अभ्यासक्रमासाठी त्या कारने चंद्रपूरकडे निघाल्या असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

दरम्यान, महिला पोलिस शिपायाचा अपघाती मृत्यू झाल्याचे समजताच पोलिस दलातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवतीचा पाण्यात बुडून मृत्यू…

नाशिक पोलिस दलातील बडतर्फ पोलिसाचा लॉजवर संशयास्पद मृत्यू…

प्रेमसंबंध! पोलिस अधिकाऱ्याच्या मृत्यू प्रकरणी महिला शिपायाला अटक…

महिला पोलिसाचा प्रसूतीदरम्यान आकस्मिक मृत्यू, बाळही दगावलं…

साईबाबाच्या दर्शनासाठी पायी जात असलेल्या पोलिसकाकाचा वाटेतच मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!