
पुणे! भोंदूबाबावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप; मुलींना मांडीवर बसवतो…
पुणे : श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धा आणि कांड असा एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्वतःला ‘गुरुवर्य’ म्हणवून घेणाऱ्या एका भोंदूबाबाने दैवी शक्ती प्राप्त असल्याचा आव आणून लोकांच्या अंधश्रद्धेचा भयंकर गैरफायदा घेतला. एका अल्पवयीन चिमुकलीचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप या नराधमावर करण्यात आल्यानंतर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
स्वप्नील लांडे असे आरोपी स्वयंघोषित ‘गुरुवर्याचे’ नाव आहे. अंधश्रद्धा, भीती आणि चमत्कारांच्या खोट्या आमिषांना बळी पाडून त्याने अनेक कुटुंबांचा विश्वास संपादन केला होता. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, या भोंदूबाबाने एका अल्पवयीन मुलीला स्वतःच्या मांडीवर बसवून तिच्या कानात मंत्र फुंकल्याचा देखावा केला. “तुला कसलीही अडचण आली किंवा संकट आले तर थेट माझ्याकडे ये,” असे सांगत तिच्या निरागसतेचा आणि अंधश्रद्धेचा गैरफायदा घेऊन तिचे लैंगिक शोषण केले. या धक्कादायक प्रकारानंतर पीडित अल्पवयीन मुलीचं सध्या तज्ज्ञांकडून कौन्सिलिंग केले जात आहे. दुसरीकडे, आरोपी स्वप्नील लांडे हा पुण्यातील बिबवेवाडी परिसरातील रहिवासी असून, या घटनेची वाच्यता होताच आणि पोलिसांत गुन्हा दाखल होण्याची कुणकुण लागताच तो फरार झाला आहे.
View this post on Instagram
पुणे पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने तपासाची चक्रे फिरवली आहेत. फरार भोंदूबाबा स्वप्नील लांडे याच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे. दैवी शक्ती आणि चमत्कारांच्या नावाखाली या भोंदूबाबाने आणखी किती बालकांचे शोषण केले आहे किंवा किती कुटुंबांना फसवले आहे, याचाही पोलिस बारकाईने शोध घेत आहेत. समाजात अजूनही पसरलेल्या अशा भोंदू प्रवृत्तींना वेळीच ओळखून त्यांच्यावर कडक पोलिस कारवाई आणि कठोर शिक्षेची मागणी आता जोर धरू लागली आहे.
दरम्यान, पुण्यातील आणखी एका अध्यात्मिक गुरुंचा व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. उमेश तागुंदे नावाच्या या गुरुंच्या शिष्या त्यांचे पाणी आणि दुधाने पाय धुऊन ते दुध प्राशन करताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. उमेश तागुंदे यांचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एक दोन नाही, तर असे अनेक शिष्य आणि शिष्या उमेश तागुंदेंचे पाय धुऊन पाणी पिताना व्हिडीओमध्ये दिसत आहेत.
भांडाफोड! अशोक खरात याचे ऑफिसनंतर फार्महाऊसमधील व्हिडीओ SITच्या हाती…
पुणे! भोंदूबाबा अश्लिल व्हिडिओ पाहायचा अन् महिला अनुयायींसमोरच…
पुणे शहरात उच्चशिक्षित महिलेसोबत भोंदूबाबाने केला अत्यंत घृणास्पद प्रकार…
सांगलीत भोंदूबाबाकडून लैंगिक अत्याचार; तू मागच्याजन्मी नागीन अन् हा नाग…
भोंदू राजेंद्र गडगे याच्याकडे निघाले 200 व्हिडीओ अन् 90 गोळ्या…

