पोलिस अधिकारी संतोष केंद्रे यांची चपळाई; बादल कुटुंबियांकडून रोख बक्षीस जाहीर…

नांदेड : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल गुरुवारी (ता. १३) झालेल्या कृपाण हल्ल्यात ते जखमी झाले. त्यांच्या उजव्या हाताला जखम झाली असून प्रकृती स्थिर आहेत. या प्रकरणातील हल्लेखोर जसपालसिंग याला अटक करण्यात आली आहे. बादल यांच्यासोबत असलेल्या ‘एसपीयू’चे निरीक्षक संतोष केंद्रे यांनी चपळाईने हल्लेखोराला रोखले. हल्ल्यात रक्तबंबाळ झालेल्या केंद्रे यांची बादल कुटुंबीयांनी विचारपूस करत चरणस्पर्श केले. तसेच त्यांना पाच लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले आहे.

सुखबीरसिंग बादल यांच्यासोबत त्यांच्या पत्नी खासदार हरसिमरतकौर बादल व त्यांच्या परिवारातील दोन सदस्य नांदेडमध्ये आले आहेत. येथील मुख्य गुरुद्वारात बादल परिवारातर्फे अखंड पाठ ठेवण्यात आला असून, त्याची सुरुवात बुधवारी सायंकाळनंतर झाली, तर शनिवारी या पाठाची समाप्ती होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुखबीरसिंग बादल हे बुधवारी सायंकाळी गुरुद्वारा दर्शनासाठी नांदेडमध्ये दाखल झाले होते. त्यांच्या संरक्षणासाठी मोठा बंदोबस्त होता. गुरुवारी बादल दर्शनासाठी नांदेडपासून जवळच असलेल्या ऐतिहासिक माता साहिब गुरुद्वारा येथे गेले होते. दुपारी पावणेदोनच्या सुमारास सहपरिवार दर्शन घेऊन बाहेर येत असतानाच निहंगांची वस्त्रे परिधान केलेल्या हल्लेखोराने त्यांच्यावर कृपाणाने (छोटी तलवार) वार केला.

महाराष्ट्र पोलिसांच्या ‘स्पेशल प्रोटेक्शन युनिट’चे (एसपीयू) निरीक्षक संतोष केंद्रे यांनी जेव्हा हल्लेखोराला हातात ‘कृपाण’ घेऊन पुढे येताना पाहिले, तेव्हा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पुढे झाले. निरीक्षक केंद्रे यांनी सुखबीर बादल आणि हल्लेखोर यांच्यामध्ये स्वतःला उभे करून एक मानवी ढाल तयार केली. हल्लेखोराला नियंत्रणात आणण्याच्या आणि सुखबीर बादल यांची सुरक्षा निश्चित करण्याच्या प्रयत्नात केंद्रेंच्याही हाताला दुखापत झाली. दुखापत होऊन, रक्तस्त्राव होत असतानाही निरीक्षक केंद्रे मागे हटले नाहीत. उलट त्यांनी अत्यंत धैर्याने परिस्थिती हाताळली आणि सुखबीर सिंग बादल यांना पूर्णपणे सुरक्षित ठेवले.

दरम्यान, हल्ल्यात जखमी झालेले निरीक्षक संतोष केंद्रे यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. निरीक्षक संतोष केंद्रे यांची कर्तव्यनिष्ठा आणि शौर्य पाहून प्रभावित झालेल्या ‘बादल’ कुटुंबातील सदस्यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. कृतज्ञतेच्या भावनेने भारावून जाऊन त्या कुटुंबीयांनी निरीक्षक संतोष केंद्रे यांचे चरणस्पर्श केले आणि त्यांचे आभार मानले. सुखबीरसिंग बादल यांच्या पत्नी हरसीमरत कौर यांनी केंद्रेंना पाच लाख रुपयांची रोख रक्कमही देऊ केली, अशी माहिती मिळते. नांदेडमधील त्या घटनेनंतर निरीक्षक संतोष केंद्रे यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. पोलिसांनी हल्लेखोरास तेथेच ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली; पण सुरुवातीला त्याने आपले नाव व अन्य माहिती सांगण्यास नकार दिला. नंतर त्याला पोलिस बंदोबस्तात मुदखेड पोलिस ठाण्यात नेण्यात आले. हल्ल्यामागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये जीवघेणा हल्ला…

बीड! किंग पॅटर्न कृष्णा आंधळे-1313 तुला दाखवतो म्हणत केला हल्ला…

लग्न लागले अन् नवरदेवावर केला चाकूने हल्ला; हल्लेखोर निघाला…

उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर प्राणघातक हल्ला; आरोपीला अटक…

पहलगाम दहशतवादी हल्लाप्रकरणी मोठं यश; शिक्षक निघाला गद्दार…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!