
हृदयद्रावक! पुणे शहरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना…
पुणे : पुणे शहरातील खराडीजवळील नदीपात्रात नवजात चिमुकलीचा शुक्रवारी दुपारी मृतदेह आढळून आला आहे. जन्मानंतर अज्ञात व्यक्तीने या नवजात अर्भकाला नदीत फेकून दिल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. नदीपात्रात नवजात अर्भकाचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच वाघोली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस पुढील तपास करत आहेत.
मृत अर्भक स्त्री जातीचे असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या चिमुकलीचा जन्म नुकताच झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. जन्मानंतर अज्ञात व्यक्तीने तिला नदीत फेकून दिले असावे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी नदीपात्रात मृतदेह असल्याची खात्री केली. त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाची मदत घेण्यात आली.
View this post on Instagram
नदीपात्रात मृतदेह असल्याची खात्री झाल्यानंतर शहीद भगतसिंग जीवन रक्षक फाउंडेशनचे जीवरक्षक बच्चूसिंग टाक यांनी बोटीच्या साहाय्याने नदीत उतरून नवजात अर्भकाचा मृतदेह बाहेर काढला. मृतदेह बाहेर काढल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. त्यानंतर नवजात चिमुकलीचा मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणी आणि शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.
दरम्यान, या घटनेनंतर वाघोली पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. नवजात चिमुकलीला जन्म दिल्यानंतर नदीत कोणी आणि कोणत्या कारणातून फेकून दिले, याचा तपास पोलीस करत आहेत. घटनास्थळाच्या परिसरातील माहिती, उपलब्ध पुरावे आणि इतर बाबींच्या आधारे अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
हृदयद्रावक! पुणे शहरात आईच्या मृत्यूनंतर मुलाने घेतला जगाचा निरोप…
पुणे! युवतीने 9व्या मजल्यावरून घेतली उडी; हृदयद्रावक चिठ्ठी…
हृदयद्रावक घटनेने पुणे हादरले! नवजात बालकाच्या तोंडावर चक्क प्लास्टिकची पिशवी बांधली अन्…
हृदयद्रावक Video! पुणे शहरात जुळ्या मुलींचा एकाचवेळी दुर्देवी मृत्यू…
पुणे! पती-पत्नीचा संशयावरून वाद अन् तीन मांजरींचा होरपळून मृत्यू…

