
हृदयद्रावक! पोलीस भरतीसाठी धावण्याचा सराव करताना खाली कोसळला अन्…
धुळे: पोलीस भरतीसाठी धावण्याचा सराव करताना युवकाचा हृदयविकाराने निधन झाल्याची घटना धुळे तालुक्यातील नगाव येथे सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली आहे. काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
सुहास संभाजी पाटील (वय २८) असे मृत युवकाचे नाव आहे. सुहास हा अत्यंत गरिबीतून आणि हलाखीच्या परिस्थितीतून पुढे आला होता. मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर ६ महिन्यांपूर्वीच त्याची ‘महाराष्ट्र सुरक्षा दलात’ निवड झाली होती. मुंबईत नोकरीला असलेला सुहास काही दिवसांच्या सुट्टीसाठी धुळ्यातील आपल्या नगाव या मूळ गावी आला होता. खाकी वर्दी मिळाली तरीही पुढे अजून मोठी पोलीस भरती मारायची, या जिद्दीने तो रोज न चुकता सराव करत होता. सोमवारी सायंकाळीही तो गावाजवळील रस्त्यावर धावण्याचा सराव करत होता. सराव करताना अचानक त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तो रस्त्यावरच कोसळला. उपस्थितांनी क्षणाचाही विलंब न करता त्याला तातडीने रुग्णालयात हलवले, मात्र दुर्दैवाने उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
View this post on Instagram
सुहास याच्या या अकस्मात जाण्याने नगाव आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, या गावात गेल्या दोन वर्षांत घडलेली ही दुसरी हृदयद्रावक घटना आहे. याआधी ४ मार्च २०२४ रोजी जयेश कैलास पाटील (वय १९) या युवकाचाही असाच धावताना हृदयविकाराने मृत्यू झाला होता.
हृदयद्रावक! पुण्यात पोलिस भरती प्रक्रियेदरम्यान युवकाचा मृत्यू; स्वप्न अधुरे अन् वडील…
हृदयद्रावक! पोलिस भरतीसाठी सराव करताना काळाचा घाला…
हृदयद्रावक! पतीच्या निधनानंतर पोलिसात भरती अन् शिवशाही बस अपघातात मृत्यू…
हृदयद्रावक! पोलिस भरतीसाठी धावताना अक्षय जमीनीवर कोसळला अन्…
पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवतीचा पाण्यात बुडून मृत्यू…

