
मुलीने स्थळ नाकारलं अन् शेजाऱ्याच्या मुलावर प्रेम कळलं, आईने दाबला गळा…
उल्हासनगर : मुलीचे प्रेम संबंध मान्य नसलेल्या आईनेच आपल्या १९ वर्षीय मुलीची गळा आवळून हत्या केल्याची घटना घडली आहे. स्वत: आईनेच कबुली दिल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी महिलेला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उल्हासनगरच्या भैय्यासाहेब आंबेडकर नगर परिसरात ही घटना घडली. अमृता गरुड असे मृत मुलीचे नाव तर आशा गरुड मुलीचा खून करणाऱ्या आईचं नाव आहे. आशा गरूड यांची मुलगी अमृता गरुड हिचे शेजारी राहणाऱ्या युवकावर प्रेम होते. पण, याबद्दल कुटुंबीयांना माहिती नव्हती. अमृताला बघायला स्थळ आलं होते. पण अमृताने मुलाला नकार दिला. जेव्हा आरोपी आशा गरूड यांनी मुलीकडे नकार का दिला अशी विचारणा केली. तेव्हा, अमृताने माझं शेजारी राहणाऱ्या मुलावर प्रेम असल्याचे आईला सांगितले. पण, त्या मुलाला कामधंदा नसताना चांगल्या स्थळाला नकार देऊन आपली मुलगी शेजारी राहणाऱ्या तरुणावर प्रेम करते याचा आईला राग होता.
View this post on Instagram
अमृता आणि तिच्या आई मध्ये पुन्हा एकदा लग्नाच्या मुद्यावरून रविवारी रात्रीच्या सुमारास जोरदार भांडण झाले. आशा यांनी अमृताची समजूत काढली. पण, ती ऐकायच्या मनस्थितीत नव्हती. त्यावेळी रागाच्या भरात आईने ओढणीने अमृताचा गळा आवळून तिची हत्या केली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे घरात एकच गोंधळ उडाला. या घटनेनंतर अमृताच्या वडिलांनी उल्हासनगर पोलिसांना फोन करून माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अमृताचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. तर आई आशा गरुड हिला अटक करण्यात आली. याप्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत अमृतेच्या आईला अटक केली असून, पुढील तपास पोलिस करत आहेत.
पुणे! लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक; मला बघताच पळतो; नेत्यावर गंभीर आरोप…
नांदेड! प्रेमसंबंध अन् जे होईल ते होईल, आज काय तो सोक्षमोक्ष लावून टाकू…
नाशिकमध्ये महिलेचा सुटकेसमध्ये मृतदेह; अनैतिक प्रेमसंबंधातून संपवलं…
प्रेमसंबंध! दीर पहाटेच्या सुमारास वहिनीच्या खोलीत घुसला अन्…
नाशिक! महिला डॉक्टरच ठरली मनीषा जेजुरकरांच्या मृत्यूला कारण; प्रेमसंबंध…

