
पुणे! पती-पत्नीचा संशयावरून वाद अन् तीन मांजरींचा होरपळून मृत्यू…
पुणे: सिंहगड रस्ता परिसरातील सावित्रीबाई फुले वसाहतीत पत्नीशी झालेल्या कौटुंबिक वादाच्या रागातून एकाने घरातील साहित्य पेटवून दिले. या आगीत घरातील संपूर्ण गृहोपयोगी साहित्य जळून खाक झाले असून, घरात असलेल्या तीन पाळीव मांजरांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पर्वती पोलिस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
View this post on Instagram
मोहिनी दयानंद कसबे (वय ३६, रा. सावित्रीबाई फुले वसाहत, सिंहगड रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पती दयानंद आनंता कसबे (वय ३८) याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दयानंद याची एका महिलेशी असलेली मैत्री फिर्यादी पत्नीला मान्य नव्हती. या कारणावरून गेल्या काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये सतत खटके उडत होते. फिर्यादीच्या मुलाने वडिलांना संबंधित महिलेशी बोलताना पाहिले आणि ही गोष्ट आपल्या आईला सांगितली. त्यानंतर पत्नीने त्या महिलेला जाब विचारला असता, संबंधित महिलेने आरोपी दयानंदला फोन करून या प्रकाराबाबत सुनावले.
पती-पत्नीमध्ये पुन्हा जोरदार वाद झाला. यावेळी संतापाच्या भरात दयानंदने घरातील साहित्याला आग लावली. आग भडकल्याचे पाहताच पत्नीने जीव वाचवण्यासाठी घराबाहेर पळ काढला, ज्यामुळे त्या सुदैवाने बचावल्या. मात्र, या भीषण आगीत घरातील सर्व संसार जळून भस्मसात झाले आणि निष्पाप तीन पाळीव मांजरांचा होरपळून मृत्यू झाला. घराला आग लागल्याची माहिती मिळताच परिसरातील रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पाण्याच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. आग लावल्यानंतर आरोपी पती घटनास्थळावरून पसार झाला. पर्वती पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे! PSIचा कॅफेमधील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर निलंबन; अन् आता…
पुणे शहरात पालखी सोहळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ; खाजेची पावडर टाकायचे अन्…
पुणे! प्रेमविवाह केल्यानंतर नवऱ्याचे अनैतिक संबंध पत्नीला समजले अन्…
हृदयद्रावक! पुणे शहरात आईच्या मृत्यूनंतर मुलाने घेतला जगाचा निरोप…
पुणे! भोंदूबाबा अश्लिल व्हिडिओ पाहायचा अन् महिला अनुयायींसमोरच…

