वाढदिवसाची पार्टी! BMW 250 च्या स्पीडने पळवली अन् युवक-युवतीचा जागीच मृत्यू…

नवी मुंबई : मुंबई-बडोदा महामार्गावर भरधाव वेगात असलेल्या बीएमडब्ल्यू कारच्या झालेल्या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक तरुण गंभीर जखमी आहे. अपघात इतका भयंकर होता की कारचा अक्षरशः चुराडा झाला आणि मृतदेहांचे अवयव दूरवर विखुरले गेले. अपघाताच्या वेळी कारचा वेग तब्बल २५० किलोमीटर प्रति तासापेक्षा जास्त असल्याची माहिती पुढे आली आहे.

योगेश नेगी (वय २६, रा. बदलापूर) आणि रेबेका जेकब (वय २४, रा. वांद्रे) असे अपघातात मृत पावलेल्या दोघांची नावे आहेत. योगेशचा वाढदिवस असल्याने त्याने बदलापूर पश्चिमेला मित्रांसोबत पार्टी केली होती. पार्टीनंतर रविवारी (ता. २१) मध्यरात्री योगेश, रेबेका आणि कारचा मालक अंगद हे तिघेही मुंबई-बडोदा एक्स्प्रेसवेवर फेरफटका मारण्यासाठी गेले होते. बीएमडब्ल्यू कार टिटवाळ्याहून बदलापूरच्या दिशेने येत होती. एरंजाड परिसराजवळ चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव कार थेट दुभाजकावर जाऊन आदळली. ही धडक इतकी जोरदार होती की, कार अनेक वेळा पलटी खात रस्त्यावर घासत गेली.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, “कार दोनदा खूप वेगाने निघून गेली. तिसऱ्या वेळी एका मोठ्या स्फोटासारखा आवाज आला. आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा कार पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. युवती कारमधून उडून खूप दूर जाऊन पडली होती आणि काही वेळातच तिचा मृत्यू झाला.”

दरम्यान, घटनास्थळाची माहिती मिळताच पोलिस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली होती. भीषण अपघाताचे खरे कारण पोलिस तपासानंतरच स्पष्ट होईल. पोलिस पुढील तपास करत आहेत.

सुप्रसिद्ध रीलस्टार प्रेम भाटी याचे अपघाती निधन; चाहत्यांना धक्का…

हृदयद्रावक! वरमाय-वरपित्यासह लग्न ठरलेल्या दुचाकीस्वार युगुलाचाही अपघाती मृत्यू…

हृदयद्रावक! मामाच्या गावाला निघालेल्या दोन सख्ख्या बहिणींचा अपघातात जागीच मृत्यू…

भीषण अपघात! सातारच्या आठ मित्रांची हर्णे बीचची ट्रीप ठरली अखेरची; पाहा मृतांची नावे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!