
पुणे! भोंदूबाबा अश्लिल व्हिडिओ पाहायचा अन् महिला अनुयायींसमोरच…
पुणे: पुणे शहरातील खराडी परिसरातील भोंदूबाबा राधामोहन मिश्रा प्रकरणाच्या तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडित तरुणीने नोंदवलेल्या पुरवणी जबाबात धक्कादायक खुलासे केले आहेत. मिश्रा स्वतःच्या महिला अनुयायांसमोरच पीडित युवतीवर अत्याचार करत होता, अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणी खराडी पोलिसांनी मुख्य आरोपी राधामोहन मिश्रा, स्वामी कंवलनयन आणि त्यांच्या सहा महिला अनुयायांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, सध्या सर्व आरोपी पोलीस कोठडीत आहेत.
पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, 2013 मध्ये उबाळेनगर येथील आश्रमात वास्तव्यास असताना, तिथल्या महिला अनुयायीच तिला द्यायच्या शिक्षा ठरवत असत. आश्रमातील काम वेळेत पूर्ण न झाल्यास पीडितेला ‘टेझर गन’चे शॉक दिले जायचे, तसेच मेणबत्तीचे चटके आणि जबर मारहाण केली जात होती. अनेकदा तिला विवस्त्र करून मिश्राच्या खोलीत ढकलले जायचे. या कृत्याला विरोध केल्यास, “आम्हीही हे सहन केले आहे, हाच कल्याणाचा मार्ग आहे,” असे सांगत.
View this post on Instagram
काही महिला अनुयायी आधी मिश्राला आक्षेपार्ह आणि अश्लिल व्हिडिओ दाखवायच्या आणि त्यानंतर पीडितेवर अत्याचार केले जायचे. अत्याचार करताना विरोध होऊ नये म्हणून अनेक प्रसंगी पीडितेचे हात-पाय बांधण्यात आले, तिला गुंगी आणणारी इंजेक्शने देण्यात आली; तसेच तिला जबरदस्तीने मूत्र पाजल्याचा अमानुष दावाही पीडितेने आपल्या जबाबात केला आहे.
दरम्यान, उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या वकिलांच्या युक्तिवादात प्राथमिक तथ्य असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. न्यायालयाने आरोपींना जामिनासाठी थमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात अर्ज करण्याची मुभा दिली आहे. तसेच, या अटकेच्या वेळेबाबत राज्य सरकारला आपले प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश दिला आहे. या याचिकेवर आता सोमवारी पुढील सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुणे शहरात उच्चशिक्षित महिलेसोबत भोंदूबाबाने केला अत्यंत घृणास्पद प्रकार…
पुणे! भोंदूबाबाचे अश्लील चाळे; चिठ्ठीवर तारीख लिहायचा अन्…
पुणे! भोंदूबाबाचे अश्लील चाळे; चिठ्ठीवर तारीख लिहायचा अन्…
सांगलीत भोंदूबाबाकडून लैंगिक अत्याचार; तू मागच्याजन्मी नागीन अन् हा नाग…
महाराष्ट्र हादरला! शनी अमावस्येच्या पूजेनंतर भोंदूबाबाकडून युवक-युवतीचा खून; श्वान अन् रुमाल…
भोंदू राजेंद्र गडगे याच्याकडे निघाले 200 व्हिडीओ अन् 90 गोळ्या…
महाराष्ट्रातील आणखी एका भोंदूचा महिलेसोबत किळसवाणा प्रकार…

