
पंढरपूर! पिकअप विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू; गावावर शोककळा, पाहा मृतांची नावे…
सोलापूर : म्हसवड-पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळ पिकअप गाडी विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. म्हसवड येथील 14 जणांचा एक ग्रुप सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेला होता. यानंतर परतीच्या मार्गावर असताना वाहनाचा नियंत्रण सुटून पिकअप वॅन विहिरीत कोसळली. या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाल्यामुळे पंढरपूर तालुक्यातील अख्ख्या रांजणी गावावर शोककळा पसरली आहे.
म्हसवड येथील सिद्धनाथाच्या दर्शन घेऊन परतून येत असताना 14 प्रवासी असलेली पिकअप थेट विहिरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला. सुदैवाने 6 जणांना जिवंत वाचवण्यात यश आले असून त्यांना उपचारासाठी पंढरपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये पंढरपूर तालुक्यातील सर्व रांजणी गावचे असल्याने अवघ्या गावावर शोककळा पसरली आहे. विहिर अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याचे सुद्धा समोर आले आहे. या विहीरीविरोधात तक्रार सुद्धा करण्यात आली होती. रस्त्याला लागूनच ही विहिर असून पूर्णपणे उघडी होती. जर विहिराला सरंक्षण कठडा असता तर हा अपघात घडलाच नसता असे देखील बोलले जात आहे.
View this post on Instagram
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटलं की, ‘ सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील तांदळवाडी येथे एक वाहन खासगी शेतातील विहिरीत पडल्याने झालेल्या अपघातात काही भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. अपघातातून 7 जणांचे प्राण वाचविण्यात यश आलंय. त्यांच्यावर उपचार केले जाताहेत. जिल्हाधिकारी-पोलिस अधीक्षक दोघेही तातडीने घटनास्थळी रवाना झालेत. ते स्थानिक प्रशासनाच्या सातत्याने संपर्कात आहोत. या घटनेतील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकारकडून देण्यात येईल’, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
पंढरपूर-म्हसवड महामार्गावर झालेल्या अपघातस्थळी सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकी यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांनी या अपघाताच्या त्रिस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील रस्त्याच्या कडेला जेवढ्या विहिरी आहेत. त्या विहिरींचा सर्व्हे करून त्या विहिरींना संरक्षण कठडे बसवण्याच्या सूचना दिल्या जातील, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्तिकी यांनी दिली.
मृतांची नावे पुढीलप्रमाणे…
इंदुबाई दशरथ बावचे, महिला , ६० वय
पुजा अमोल सातोरे, महिला, २३
पुजा बालाजी बावचे, महिला , २७
अश्विनी संदीप बावचे, महिला , २७
अश्विनी संदिप बावचे, महिला , १४
संस्कार संदिप बावचे, पुरुष , १४
संस्कृती संदिप बावचे, महिला, १४
आरव अमोल सातोरे, पुरुष , ८
समर्थ बालाजी बावचे, पुरुष, ६ महिने
हृदयद्रावक! नाशिकमध्ये अपघातात ८ जणांचा मृत्यू; पाहा नावे; स्टेटस टाकलं अन्…
जालना! कार 80 फूट विहिरीत कोसळून 5 जणांचा जागीच मृत्यू…
भीषण अपघात! नांदेडमध्ये मजुरांनी भरलेला ट्रॅक्टर विहिरीत कोसळला, 8 जणांचा मृत्यू…
जामखेडमध्ये बोलेरो कार विहिरीत कोसळल्याने चौघांचा मृत्यू; पाहा नावे…
जेजुरीवरून परतताना रिक्षा पडली विहिरीत; नवविवाहीत दाम्पत्यासह मुलीचा मृत्यू…

