पुणे शहरात जड/अवजड वाहनांना प्रवेशबंदी; पाहा पर्यायी मार्ग…

पुणे (संतोष धायबर): पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अपघातांची शक्यता आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पुणे शहर पोलिसांनी जड व अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध लागू केले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, पुणे यांच्या आदेशानुसार आणि मोटार वाहन कायदा १९८८ मधील तरतुदींनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे शहरात दररोज सकाळी ७.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत जड व अवजड वाहनांना प्रवेशबंदी लागू राहणार आहे. या कालावधीत शहरातील मुख्य मार्गांवर अशी वाहने येण्यास मनाई करण्यात आली आहे. वाहतूक कोंडी टाळणे, रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करणे आणि नागरिकांना सुरक्षित व सुरळीत प्रवास उपलब्ध करून देणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

पुणे शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे…

१. सोलापूरकडून मुंबईकडे जाणारी वाहने
या वाहनांना शहरात प्रवेश न देता खालील पर्यायी मार्गांचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत :
केडगाव चौक – न्हावरे – तळेगाव ढमढेरे – शिक्रापूर – चाकण मार्ग
उरळी कांचन – कोरेगाव मूळ – आळंदी – तळेगाव ढमढेरे – शिक्रापूर – चाकण मार्ग
थेऊर फाटा – केसनंद – लोणीकंद – कुळगाव फाटा – आंबेठाण मार्ग

२. मुंबईकडून सोलापूरकडे जाणारी वाहने
तळेगाव एमआयडीसी – चाकण – शिक्रापूर – तळेगाव ढमढेरे – न्हावरे – केंगाव चौक – सोलापूर महामार्ग
तळेगाव एमआयडीसी – चाकण – शिक्रापूर – तळेगाव ढमढेरे – आळंदी – कोरेगाव मूळ – उरळी कांचन मार्ग
कात्रज – मंतरवाडी फाटा – सासवड – दिवेघाट – सासवड – जेजुरी – मोरगाव – सुपे – केंगाव चौक मार्ग

३. मुंबईहून अहमदनगरकडे जाणारी वाहने
खेड शिवापूर, वाघोली, वडू, मंचर, नारायणगाव, आळेफाटा मार्गे अहमदनगर
नारायणगाव – टाकळी ढोकेश्वर – कोपरगाव – शिर्डी – अहमदनगर

४. अहमदनगरहून मुंबईकडे जाणारी वाहने
शिक्रापूर – चाकण – तळेगाव मार्गे मुंबई

५. साताराकडून सोलापूरकडे जाणारी वाहने
सातारा – जेजुरी – मोरगाव – सुपे – केंगाव चौक मार्ग

६. पुणे शहरात येणारी परंतु शहरातून पुढे जाणारी वाहने
अशा वाहनांनी शहरात न प्रवेश करता रिंग रोडसदृश पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे शहरातील अंतर्गत वाहतुकीसाठी मार्गदर्शन
अहमदनगरकडून पुणे शहरात
नागर रोड – वाघोली – खराडी बायपास – विमाननगर – येरवडा – गोल्फ क्लब चौक – आंबेडकर रोड – जंगली महाराज रोड – पद्मावती चौक – हडपसर बायपास मार्गे वाहतूक वळविण्यात येणार आहे.

सोलापूर रोडकडून पुणे शहरात
मगरपट्टा – फातिमा नगर – गुलटेकडी – स्वारगेट – शनिवार पेठ – डेक्कन परिसर मार्गे वाहतूक सुरू राहील.

सातारा रोडकडून कोथरूडकडे
बंगळुरू महामार्ग – नवले ब्रिज – कर्वेनगर – कोथरूड मार्गाचा वापर करण्याचे निर्देश आहेत.

मुंबई/पिंपरी-चिंचवडकडून पुणे शहरात
हिंजवडी – वाकड – पिंपरी – दापोडी – खडकी – शिवाजीनगर मार्गे शहरात प्रवेश देता येईल.

आवश्यक सेवा वाहनांना सूट
या आदेशातून पेट्रोल, डिझेल, गॅस, जीवनावश्यक वस्तू वाहून नेणारी वाहने तसेच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना सूट देण्यात आली आहे. त्यामुळे अशा वाहनांच्या हालचालीवर निर्बंध लागू राहणार नाहीत.

नागरिकांना आवाहन…
पुणे शहर पोलिसांनी वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक व्यवस्थेला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. जड व अवजड वाहनचालकांनी प्रवेशबंदीच्या वेळेत शहरात प्रवेश टाळून जाहीर करण्यात आलेल्या मार्गांचा वापर करावा, अन्यथा वाहतूक नियमांनुसार कारवाई होऊ शकते. या निर्णयामुळे पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास, अपघातांचे प्रमाण घटण्यास आणि नागरिकांना अधिक सुरक्षित व सुरळीत प्रवासाचा अनुभव मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पुणेकरांच्या गाड्यांना आता ‘तीन अक्षरी’ नंबरप्लेट! MH-12 ऐवजी…

पुण्यात वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई; दंड न भरल्यास थेट…

HSRP नंबरप्लेट नसणाऱ्यांवर होणार कारवाई; पाहा किती दंड भरावा लागेल…

पुणे-नगर रस्त्यावर ट्रॅव्हल्स गाड्यांचे साम्राज्य; पोलिसांचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!