रिलस्टार रोहिणी पाराध्ये हिने आयुष्य का संपवलं? कारण आलं समोर…

सोलापूर : मंगळवेढा तालुक्यात आपल्या पतीसोबत ‘हॉटेल ग्रामपंचायत’ चालवणाऱ्या रोहिणी निलेश पाराध्ये (वय २५) हिने हॉटेलमध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली. रोहिणी हिनं असं टोकाचं पाऊल का उचललं? हाच प्रश्न तिच्या फॉलोअर्सना पडला आहे.

मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे फेमस रील स्टार रोहिणी पाराध्ये हिने गळफास घेऊन आत्महत्या प्रकरणी आता पोलिस मृत्यूच्या कारणाचा शोध घेऊ लागले आहे. ‘हॉटेल ग्रामपंचायत’ नावानं व्यवसाय करत असणाऱ्या आपल्याच हॉटेलात रोहिणीनं टोकाचं पाऊल उचलले. हॉटेल व्यवसायाच्या शाखा वाढल्या आणि यातून आलेल्या तणावामुळे आणि झालेल्या वादामुळे रोहिणी हिने रागात आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त होत आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 165 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 165 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथील हॉटेल ग्रामपंचायत याच ठिकाणी रोहिणी आपले पती निलेश सोबत राहत होती. सोमवारी हॉटेलच्या साप्ताहिक सुट्टीनंतर मंगळवारी हॉटेल ग्रामपंचायत हे उघडलेच गेले नाही. याच दरम्यान दुपारी एक वाजण्याच्या सुमारास रोहिणीने स्वतःच्या स्वयंपाक खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. याबाबत रोहिणीला उपचारासाठी तातडीने मंगळवेढा येथे नेण्यात आले. मात्र रुग्णालयात जाण्यापूर्वीच तिचा शेवट झाला.

रोहिणी आणि तिचे पती निलेश यांचा प्रेमविवाह झाला होता. आंतरजातीय विवाह करून हे दोघेही पुणे येथे काही काळ वास्तव्य करत होते. पुणे इथे असतानाच हे दोघेही रील करू लागले. यानंतर आपल्या मूळ गावी परतल्यानंतर त्यांनी ‘हॉटेल ग्रामपंचायत’ नावानं हॉटेल व्यवसाय सुरू केला. हॉटेलमधील रोजच्या खेळीमेळीच्या वातावरणातील रील बनवून रोहिणी आणि निलेश दोघेही प्रसिद्ध झाले आणि त्यांचं हॉटेलही यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचले.

मंगळवेढा तालुक्यातच दोन ठिकाणी नव्यानं हॉटेलच्या शाखा सुरू केल्या. मात्र, या दोन्ही शाखांचे व्यवस्थापन करणं, जिकरीचं होत होते. यातूनच दोघांत वाद आणि तणाव निर्माण झाल्याची चर्चा आहे. रोहिणीनं हे टोकाचं पाऊल उचललं असावं अशी चर्चा आहे. महत्वाचं म्हणजे, रोहिणीचा निलेश सोबतच दुसरा विवाह असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे नीलेशसोबत प्रेमविवाह झाल्यावर नक्की कुठल्या कारणानं तिनं हे टोकाचं पाऊल उचललं? नक्की दोघांमधील मतभेद होता की, अन्य कुठलं वेगळं कारण होतं का? याबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जात आहे. मंगळवेढा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

धक्कादायक! प्रसिद्ध रिलस्टारने हॉटेलच्या स्वयंपाकघरात संपवलं जीवन…

धक्कादायक! मृत नवरी निघाली जिवंत अन् थेट पोहचली पोलिस स्टेशनला…

सावत्र आई अन् मुलाच्या अनैतिक संबंधांचा झाला थरारक शेवट…

नातेवाईकांचा आक्रोश होता हृदय पिळवटून टाकणारा; चिमुकल्यासह आईचा मृत्यू…

सांगलीत भोंदूबाबाकडून लैंगिक अत्याचार; तू मागच्याजन्मी नागीन अन् हा नाग…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!