
पुणे! आळंदी परिसरात घरात घुसून सामूहिक लैंगिक अत्याचार…
पुणे : आळंदी परिसरात एका महिलेला घरात घुसून मारहाण करत सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, आरोपींनी ७ एप्रिल रोजी तिच्या घरात घुसून गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतले. त्यानंतर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. तसेच घर आमच्या नावावर कर, नाहीतर तुला आणि तुझ्या कुटुंबाला त्रास देऊ, अशी धमकी दिली आहे. चार ते पाच महिन्यांपूर्वी आरोपी पीडितेच्या घरी आले होते. त्यावेळीही जबरदस्तीने शारीरिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याचबरोबर पीडितेच्या नातेवाईकांशी गैरवर्तन आणि सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी दिल्याचाही दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

Discount Price : 165 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
या प्रकरणी अभिमन्यू आंधळे, नारायण खंदारे, श्याम महाराज राठोड, राहुल चोरेडिया, कालिनाथ गुलाबराव घुले, युवराज खरमाटे आणि एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिघी पोलिसांनी गुन्हा नोंदवत पुढील तपास सुरू केला आहे.
पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, घरात घुसून आरोपींनी जबरदस्तीने महिलेवर सामूहिक लैंगिक अत्याचार केला आहे. ही घटना ७ एप्रिल २०२६ तसेच चार-पाच महिन्यांपूर्वी दिघी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आळंदी येथे घडली आहे. पीडित महिलेने याप्रकरणी २४ एप्रिल २०२६ रोजी याप्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अभिमन्यू आंधळे, नारायण खंदारे, श्याम महाराज राठोड, राहुल सुरेश चोरडीया, कानीफनाथ गुलाबराव घुले, युवराज खरमाटे यांच्यासह एका महिलेच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित हे ७ एप्रिल रोजी पीडितेच्या घरात आले. त्यांनी पीडित महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र काढुन घेतले. त्यानंतर संशयितांनी पीडित महिलेवर लैंगिक अत्याचार केले. तसेच पीडितेला शिवीगाळ केली. ‘हे तुझे घर आमच्या नावावर कर नाहीतर, ते घर विकून आम्हाला पैसे दे, नाहीतर आम्ही तुला असाच त्रास देत राहु, अशी धमकीही दिली.
राजधानी हादरली! धावत्या बसमध्ये महिलेवर 2 तास सामूहिक अत्याचार; अंगावर काटा…
आळंदीत इंद्रायणी नदीत तरंगताना दिसले 2 महिलांचे घट्ट बांधलेलले मृतदेह…
पुणे! आळंदीत चिमुकली आणि वृद्ध महिलेची निर्घृण हत्या…
आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थेत युवतीवर लैंगिक अत्याचार; गुन्हा दाखल…
पुणे! माजी नगरसेविकेच्या मुलाने आळंदीला नेऊन केलं लग्न अन् तीनवेळा गर्भपात…

