हृदयद्रावक! उच्चशिक्षित महिलेने विहिरीत उडी घेऊन संपवलं आयुष्य…

अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात घराच्या बांधकामासाठी माहेरून चार लाख रुपये आण असा तगादा लावत विवाहितेचा दोन वर्ष सासरच्या लोकांनी छळ केला. शेवटी हा त्रास सहन न झाल्याने विवाहितेने विहिरीत उडी घेत जीव संपवले आहे. हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून हे टोकाचे पाऊल महिलेने उचलले. ही घटना राहाता तालुक्यातील एकरुखे गावात घडली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

प्रिया शुभम ढगे (वय २३) असे मृत विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी राहाता पोलिसांनी पती, सासू आणि सासऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, प्रिया हिचा विवाह कोऱ्हाळे येथील शुभम ढगे याच्याशी झाला होता. लग्नानंतर काही काळ सुखात गेल्यानंतर, घराच्या बांधकामाचे कारण पुढे करत सासरच्या मंडळींनी प्रियाकडे पैशांची मागणी सुरू केली. “माहेरून ४ लाख रुपये घेऊन ये,” यासाठी २०२४ पासून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेला हा जाच सहन न झाल्याने अखेर प्रियाने टोकाचे पाऊल उचलले आणि एकरुखे शिवारातील विहिरीत उडी घेतली.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

प्रियाच्या मृत्यूनंतर तिच्या माहेरच्यांनी दिलेल्या तक्रारीवरून राहाता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी शुभम ढगे (पती), राजेंद्र ढगे (सासरा), प्रतिभा ढगे (सासू) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका उच्चशिक्षित किंवा तरुण मुलीला हुंड्यासारख्या अनिष्ट प्रथेमुळे जीव गमवावा लागल्याने कोऱ्हाळे आणि एकरुखे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. “हुंड्यासाठी छळ करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी,” अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. राहाता पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

हृदयद्रावक! लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नववधूसह तीन जणांचा अपघाती मृत्यू…

हृदयद्रावक! आईसोबत कपडे धुण्यासाठी गेले अन् कुटुंबातील तिंघाचा झाला मृत्यू…

हृदयद्रावक! नवविवाहित दांपत्याचा होरपळून मृत्यू; एका चितेवर तिघांचा अंत्यविधी…

हृदयद्रावक! पती-पत्नीने एकाच झाडाला एकाच दोरीने घेतला गळफास…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!