IPS विनायक भोसले यांची संवेदनशीलता ठरली निर्णायक; कामगिरीचे सर्वत्र होतेय कौतुक…

मेरठ (उत्तर प्रदेश): मेरठ शहरातील लिसाडी गेट परिसरातील मजीद नगर येथे घडलेल्या एका धक्कादायक हत्याकांडाने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कौसर नावाच्या महिलेची अत्यंत निर्दयी पद्धतीने हत्या करण्यात आली. घरात तिच्या तीन लहान मुली रडत असल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती.

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील सुपू्त्र आणि मेरठचे एसपी सिटी IPS विनायक गोपाल भोसले यांची संवेदनशीलता निर्णायक ठरली आणि हत्येचा गुन्हा उघड झाला. या प्रकरणात सुरुवातीला कौसरचा पती शाकिब स्वतःला निर्दोष असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करत होता. तो हत्येच्या वेळी बाजारात गेला असल्याचे सांगत होता. मात्र घरी परतल्यानंतर पत्नीचा मृतदेह पाहून तो मोठ-मोठ्याने रडू लागला, ज्यामुळे अनेकांना तो निरपराध असल्याचे जाणवत होते.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

परंतु, या प्रकरणाला निर्णायक वळण मिळाले ते मेरठचे एसपी सिटी आयपीएस विनायक गोपाल भोसले यांच्या संवेदनशील हस्तक्षेपामुळे. त्यांनी घटनास्थळी पाहणी करताना रडणाऱ्या मुलींशी संवाद साधण्यासाठी स्वतः जमिनीवर बसून त्यांना धीर दिला. त्यांच्या या मानवतावादी दृष्टिकोनामुळे एक महत्त्वाचा धागा मिळाला.

६ वर्षांच्या मुलीनेच अखेर सत्य उघड केले. तिच्या सांगण्यानुसार, तिच्या वडिलांनीच पेपर कटरने तिच्या आईची हत्या केली होती. तपासात पुढे समोर आले की, शाकिबचे दुसऱ्या महिलेबरोबर अनैतिक संबंध होते आणि त्यातूनच या हत्येचा कट रचण्यात आला. या घटनेमुळे एकीकडे कौटुंबिक हिंसाचाराचा भीषण चेहरा समोर आला, तर दुसरीकडे IPS विनायक भोसले यांच्या संवेदनशील आणि दक्ष पोलिसी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Video: महाराष्ट्राचे सुपुत्र IPS विनायक भोसले यांची दंबंग कामगिरी…

अभिमानास्पद! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट…

जिद्दीच्या जोरावर बनला IPS; गावकऱ्यांनी काढली चक्क हत्तीवरून मिरवणूक…

महाराष्ट्रातील मजुराचा मुलगा UPSC परीक्षेत उतीर्ण; IPS पदाला गवसणी…

Video! पोलिस अधिकारी IPS अमिताभ गुप्ता यांची विशेष मुलाखत…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!