आळंदीत इंद्रायणी नदीत तरंगताना दिसले 2 महिलांचे घट्ट बांधलेलले मृतदेह…

पुणे: तीर्थक्षेत्र आळंदी येथील सिद्धबेट परिसरातून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीपात्रात बुधवारी (ता. २९) रात्री दोन महिलांचे मृतदेह तरंगताना दिसले. दोन्ही महिलांनी साडीच्या सहाय्याने एकमेकींना घट्ट बांधून घेत एकत्रितपणे नदीत उडी घेऊन आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

सिद्धबेट परिसरातील इंद्रायणी नदीपात्रात बुधवारी रात्री काहीतरी तरंगत असल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. जवळ जाऊन पाहिल्यानंतर दोन महिलांचे मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. नागरिकांनी तातडीने आळंदी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह नदीबाहेर काढले. त्यावेळी या दोन्ही महिला एकमेकींना साडीने बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्या.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

मृतांमध्ये एका महिलेचे वय अंदाजे ५० ते ५५ वर्षे आणि दुसऱ्या महिलेचे वय ३५ वर्षांच्या आसपास आहे. या महिला नेमक्या कोण होत्या आणि त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात पाठवले आहेत. या महिला माय-लेकी होत्या की नातेवाईक, याचा तपास आळंदी पोलिस करत आहेत. परिसरातून कोणी महिला बेपत्ता असल्याची तक्रार आहे का, याचीही पडताळणी पोलिस करत आहेत.

पुणे! आळंदीतील दुहेरी हत्याकांडाचा उलगडा; सोशल मीडियावर ओळख; प्रेमविवाह अन्…

आळंदी येथे पेट्रोल पंपावर दरोड्याचा प्रयत्न पोलिसांनी उधळून लावला, चौघांना अटक

पुणे शहरात कुख्यात तडीपार गुंडाची कोयत्याने सपासप वार करून हत्या…

Video! पुणे जिल्ह्यात टोळक्याने युवकाला बोनेटवरुन फरफटत नेलं अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!