नाशिक IT कंपनी अत्याचार प्रकरणात नवा ट्विस्ट; घटनाक्रम समोर…

नाशिक: नाशिकच्या आयटी कंपनीतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील चार संशयितांना नाशिक न्यायालयाने बुधवारपर्यंत (ता. २९) पोलिस कोठडी सुनावली आहे. एका हिंदू युवकाला धर्मांतरासाठी प्रवृत्त करणं, त्याला अमली पदार्थ देणं आणि मानसिक छळ केल्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

तौसिफ बिलाल अत्तार, दानिश एजाज शेख, शाहरुख हुसैन शौकत कुरेशी आणि रझा रफिक मेमन या चार संशयितांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. ही सुनावणी ‘इनकॅमेरा’ पार पडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने संशयितांना ६ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

तपास यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, मुख्य संशयित तौसिफ अत्तार याने पीडित युवकाला शिरखुर्मा दिला होता, ज्यामध्ये काहीतरी मिसळल्याचा संशय आहे. तो खाल्ल्यानंतर पीडित युवकाचे डोके जड झाले आणि त्याला नशा आल्यासारखे वाटले. याच गुंगीच्या अवस्थेत त्याच्या डोक्यावर धार्मिक टोपी ठेवून त्याला बळजबरीने नमाज पठण करण्यास भाग पाडले गेले. संबंधित फोटो ‘अ‍ॅक्सिस नाशिक’ या ऑफिसच्या अधिकृत ग्रुपवर शेअर करून पीडित युवकाचे मानसिकरित्या खच्ची करण्याचा प्रयत्न झाला. तसेच, त्याला बळजबरीने विविध ठिकाणी घेऊन जात मांस खाऊ घालण्यात आले. संशयित आरोपी हे पीडित युवकाकडून त्यांची वैयक्तिक कामे करून घेत असत; आणि जर त्याने नकार दिला, तर चुकीचा रिपोर्ट देऊन त्याची करियर बरबाद करण्याची धमकी देत होते.

संबंधित प्रकरण समोर आल्यानंतर कंपनीने या घटनेची उच्चस्तरीय अंतर्गत चौकशी सुरू केली आहे. संशयित आरोपींनी आपल्या पदाचा गैरवापर करून कनिष्ठ कर्मचाऱ्याचे शोषण केल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसत आहे. नाशिक पोलिस पुढील तपास करत आहेत.

नाशिक! TCS प्रकरणात धक्कादायक खुलासा, पासवर्ड अश्लील शब्दांचा अन्…

नाशिक! TCS कंपनीतील निदा खान हिच्या जामीन अर्जावर सुनावणीपूर्वीच धक्कादायक माहिती समोर…

नाशिकमधील धर्मांतर प्रकरणाची हादरवणारी कहाणी समोर…

नाशिक! TCS HR निदा खान हिने जामीन अर्जात दिली धक्कादायक माहिती…

नाशिकमधील लैंगिक अत्याचार प्रकरण! आयटी कंपनी TCS कडून मोठा निर्णय…

नाशिक! महिला पोलिस आयटी कर्मचाऱ्यांच्या वेशात गेल्या अन् केला भांडाफोड…

अशोक खरात प्रकरणातील आणखी एक धक्कादायक माहिती समोर…

नाशिक! बड्या IT कंपनीत नोकरी द्यायचे, मग रिसॉर्टवर नेऊन करायचे अत्याचार…

नाशिक! भोंदूबाबा अशोक खरात याच्या केबिनच्या काचा पाहून पोलिस थक्क…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!