
अशोक खरात याच्याकडील गुंगी आणणारा खारट द्रव अन् पेढ्यात नेमकं काय…
नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात याला रविवारी नाशिक जिल्हा न्यायालयाने आणखी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. न्यायालयाने युक्तिवाद मान्य करत अशोक खरात याला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. यावेळी एसआयटीकडून (SIT) अशोक खरात महिलांचे लैंगिक शोषण करण्यासाठी पेढे आणि खारट चवीचे पाणी वापरत असल्याचा उल्लेख करण्यात आला.
अशोक खरात याने दिलेला द्रव पदार्थ प्यायल्यावर आणि पेढा खाल्ल्यावर पिडीत महिला प्रभावित व्हायच्या आणि भोंदूबाबा जे बोलेल त्याच्या इशाऱ्यावर चालत होत्या. हे पाणी प्यायल्यानंतर महिलांना मळमळ व्हायची, डोके गरगरायचे किंवा जड व्हायचे. यानंतर अशोक खरात केबिनमधील लाईट बंद करुन त्या महिलेवर लैंगिक अत्याचार करायचा. अशोक खरात त्यासाठी जे गुंगी आणणारे खारट किंवा कडवट चवीचे औषध वापरत होता किंवा कोणता पेढा महिलांना खायला द्यायचा, याचा तपास बाकी आहे. अशोक खरात याने याबाबत अद्याप कोणतीही उपयुक्त माहिती दिलेली नाही. त्यासाठी वेळ वाढवून द्यावा, अशी विनंती सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी न्यायालयाला केली होती. त्यामुळे आता पुढील दोन दिवसांत एसआयटी या गूढ द्रव पदार्थाबाबत आणि पेढ्यातील गुंगी आणणाऱ्या घटकाबाबतची माहिती मिळवण्यात यशस्वी होणार का, हे बघावे लागेल.

भोंदूबाबा अशोक खरात याचे सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील ईशान्येश्वर देवस्थान पुन्हा चर्चेत आले आहे. पर्यटनस्थळांच्या यादीत समावेश नसतानाही या मंदिरासाठी निधी मंजूर झाल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून 2018 मध्ये 1 कोटी 5 लाख निधी वितरित करण्यात आला. निधीसाठी कोणाचा प्रस्ताव? कोणाची शिफारस? याची माहितीच शासन दरबारी उपलब्ध नाही. प्रशासनाकडे संबंधित कागदपत्रांची स्पष्ट माहिती नसल्याचे समोर आले आहे. देवस्थान निधीचा प्रस्ताव अचानक गायब झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे अशोक खरातच्या या मंदिराला राजकीय हस्तक्षेपातून निधी मिळाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तसेच निधी मंजुरी प्रक्रियेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
नाशिक! भोंदूबाबा अशोक खरात याच्या केबिनच्या काचा पाहून पोलिस थक्क…
अशोक खरातच्या शस्त्र परवान्यात मोठा ‘ट्विस्ट’; बड्या अधिकाऱ्यांच्या खुर्च्या धोक्यात…
भोंदूबाबा अशिक खरात विरोधात आणखी गुन्हे दाखल; एक गुन्हा लैंगिक अत्याचाराचा तर दुसरा…
भोंदूबाबा अशोक खरात याचे व्हिडिओ व्हायरल कसे झाले? नाशिकचे आयुक्त संदीप कर्णिक म्हणाले…
भोंदूबाबा अशोक खरातचा तपासात अजब दावा; महिलांसोबत केलेली कृती विधीचाच भाग…
महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा खरातच्या HIV टेस्टचा अहवाल आला समोर…
सांकेतिक कोड! अशोक खरात केबिनमधील झुंबर बंद करायचा अन्…
नाशिक! अशोक खरात याचा विकृत चेहरा उघड! धक्कादायक ५ कारनामे…
नाशिक! अशोक खरात याचं आणखी एक कांड; युवतीने सगळंच सांगितलं…
अशोक खरात कामोत्तेजक आणि शक्तिवर्धक मधाची बाटली सांगायचा अन्…
नाशिकच्या अशोक खरातच्या कारनाम्यांचं बिगं नेमकं कसं फुटलं? पाहा…
अशोक खरात नाशिक पोलिसांना म्हणाला, तुम्ही घोर अपराध केलाय, तुमच्यावर…
नाशिक! अशोक खरातचं बिंग फोडणारा नीरज जाधव पोलिसांच्या ताब्यात; कुंडली येणार समोर…
नाशिक! कॅप्टन अशोक खरातच्या लैंगिक शोषणाचा पॅटर्न समोर; मी कृष्ण अन् तू माझी राधा…
नाशिक! कॅप्टन अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती समोर; घबाडंच हाती…
नाशिक! अशोक खरातच्या अश्लिल प्रकरणाला नवीन वळण; खरा चेहरा समोर…
नाशिकच्या कॅप्टन खरात या भोंदूबाबाची IPS तेजस्वी सातपुते करणार चौकशी…
नाशिक! महिला पाठमोरी उभी अन् अशोक खरातकडून गैरवर्तन; तू माझी प्रेयसी झाली नाही तर…
कॅ. खरातच्या केबिनबाहेर रांगा अन् तो महिलेसोबत चाळे करण्यात गुंग; 58 आक्षेपार्ह Video…
फलटण डॉक्टर प्रकरणाचा IPS तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात होणार तपास…

