
नाशिक! अशोक खरातचं बिंग फोडणारा नीरज जाधव पोलिसांच्या ताब्यात; कुंडली येणार समोर…
नाशिक : भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याचे बिंग फोडणारा नीरज जाधव अखेरीस पोलिसांच्या हाती लागला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. नीरजच्या चौकशीतून खरातची कुंडली आता समोर येण्याची शक्यता आहे.
भोंदूबाबा अशोक खरात याला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. पण, त्यांचे हे काळ कृत्य त्याच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या नीरज जाधव या युवकाने बाहेर आणल्याचा संशय आहे. अखेरीस कॅप्टन खरातचे बिंग फोडणारा नीरज जाधव पोलिसांच्या ताब्यात आला आहे. नीरज जाधव हा स्वत: पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. त्यानंतर आता नाशिक क्राईम पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!
नीरज जाधव याच्या विरोधात शिर्डीत गुन्हा दाखल आहे. पीडित मुलीला तिचे मॉर्फ व्हिडीओचे स्क्रीनशॉट्स पाठविल्या प्रकरणी नीरज जााधव याच्यावर गुन्हे दाखल झाले होते. नीरज जाधव यानेच कॅप्टन खरातच्या केबिनमधील सीसीटीव्ही फुटेज बाहेर आणल्याचा संशय आहे. १०० हुन अधिक महिलांचे लैंगिक शोषणाचे व्हिडीओ असल्याची माहिती समोर आली आहे.
नीरज जाधव हा खरातच्या ऑफिसमध्ये ऑफिसबॉय म्हणून काम करत होता. नीरजने खरातच्या नकळत ऑफिसमधील 58 सीसीटीव्ही व्हिडिओ मिळवले. त्यानंतर खरातला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचेही समोर आले आहे. नीरजने 5 कोटींची मागणी केली होती. पण अशोक खरातने नीरजला पैसे देण्यास नकार दिला होता. त्यामुळे पुढे जाऊन पीडितांच्या मदतीनं पुन्हा ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न करण्यात आला होता.
शिर्डीतील महिलेला मॉर्फ फोटो, व्हिडिओ खरातला पाठवले होते. नीरज हा आपल्याला धमकावत असल्याची तक्रारच काही महिलांनी खरातकडे केली होती, अशीही माहिती समोर आली. त्यानंतर खरात याने पीडित महिलांना पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला. नीरजकडून आणखी एका महिलेच्या ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. पीडित महिलेचा व्हिडीओ तिच्या नातेवाईकांना पाठवला असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर नाशिकमधील पीडितेनं पोलिसांकडे तक्रार केली होती.
नाशिक! कॅप्टन अशोक खरातच्या लैंगिक शोषणाचा पॅटर्न समोर; मी कृष्ण अन् तू माझी राधा…
नाशिक! कॅप्टन अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती समोर; घबाडंच हाती…
नाशिक! अशोक खरातच्या अश्लिल प्रकरणाला नवीन वळण; खरा चेहरा समोर…
नाशिकच्या कॅप्टन खरात या भोंदूबाबाची IPS तेजस्वी सातपुते करणार चौकशी…
नाशिक! महिला पाठमोरी उभी अन् अशोक खरातकडून गैरवर्तन; तू माझी प्रेयसी झाली नाही तर…
कॅ. खरातच्या केबिनबाहेर रांगा अन् तो महिलेसोबत चाळे करण्यात गुंग; 58 आक्षेपार्ह Video…
फलटण डॉक्टर प्रकरणाचा IPS तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात होणार तपास…

