पुणे हादरलं! लघुशंकेसाठी थांबलेल्या युवकाची ठेचून हत्या…

पुणे: पुणे शहरात कबुतर चोरीच्या संशयावरून एका युवकाला लाथाबुक्क्यांनी आणि बॅटने अमानुष मारहाण करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना वानवडीतील वैदूवाडी परिसरात घडली आहे. रूपेश शिंदे (वय १९, रा. मोशी) असे या मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

रूपेश आणि त्याचा मित्र अजय टिंगरे हे बुधवारी पहाटेच्या सुमारास मोशीकडे जात होते. यावेळी ते हडपसर जवळील एका मोकळ्या जागेत लघुशंकेसाठी थांबले होते. तेथून जवळच असलेल्या कबुतरांच्या बॉक्सजवळ गेल्यावर कुत्रे भुंकू लागल्याने हे दोघे घाबरून पळू लागले. मात्र, हे दोघे कबुतर चोर असल्याचा संशय आल्याने स्थानिक पाच जणांनी त्यांचा पाठलाग केला.

crime-book
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

पळताना रूपेश मुख्य रस्त्यावर खाली पडला. यावेळी पाठलाग करणाऱ्या संशयितांनी त्याला गाठले आणि लाथाबुक्क्यांसह क्रिकेटच्या बॅटने सपासप वार केले. या भीषण मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या रूपेशचा मृत्यू झाला. मृत युवकाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून वानवडी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी वेगाने तपास चक्र फिरवली. याप्रकरणी पोलिसांनी गौरव माजी (वय २२), सचिन माजी (वय २३), मोनु माजी (वय २६) आणि बंटी माजी (वय १८) या चार सख्ख्या भावांना सायंकाळपर्यंत अटक केली आहे. किरकोळ संशयावरून एका युवकाचा जीव गेल्याने वैदूवाडी परिसरात तणावाचे वातावरण आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

हृदयद्रावक! चिमुकल्याला पाठीवर घेऊन आई धावत सुटली पण नको ते घडलं…

पुणे शहरात युवकाची धारदार हत्याराने सपासप वार करून हत्या…

पुणे! मैत्रिणीने मेसेज करून भेटायला बोलावले अन् घरच्यांनी घेतला जीव…

पुणे हादरलं! शरीरसंबंधांना नकार देताच महिलेची हत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!