
नाशिक! गॅस सिलिंडरच्या काळाबाजाराविरोधात मोठी कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त…
नाशिक : नाशिकमध्ये गॅस सिलिंडरच्या काळाबाजाराविरोधात पुरवठा विभागाने मोठी कारवाई करत तब्बल 25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक शहरात गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर सिलिंडरचा काळाबाजार सुरू असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांच्या पथकाने सातपूर पोलिसांसह सातपूर रोडवरील नाईस संकुल परिसरात छापा टाकला. ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या छाप्यात एका ट्रकमधून मोठ्या प्रमाणावर सिलिंडरची वाहतूक सुरू असल्याचे आढळून आले. तपासणीदरम्यान 158 भरलेले आणि 289 रिकामे असे एकूण 447 सिलिंडर जप्त करण्यात आले. याशिवाय दोन छोटे टेम्पो आणि एक मोठा ट्रकही ताब्यात घेण्यात आला. जप्त केलेल्या सर्व मुद्देमालाची किंमत सुमारे 25 लाख रुपये असल्याची माहिती पुढे आली आहे.

गॅस टंचाईचा फायदा घेत सिलिंडरचा काळाबाजार केला जात असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, नाशिकमध्ये या प्रकारातील हा पहिलाच गुन्हा दाखल झाला आहे. सातपूर पोलिसांनी जीवनावश्यक वस्तूंच्या काळाबाजारासंदर्भातील कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवत चौकशीला सुरुवात केली आहे. दरम्यान, संबंधित एजन्सी चालकाने आपण काळाबाजार करत नसून सिलिंडर गोडाऊनमध्ये नेण्यासाठी वाहतूक करत असल्याचा दावा केला आहे. मात्र, पुरवठा विभाग आणि पोलीस या दाव्याची पडताळणी करत असून, या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का याचाही तपास सुरू आहे. या कारवाईमुळे गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या गैरप्रकारांवर आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नाशिक! प्रसिद्ध डॉ. मनिषा जेजुरकर आत्महत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट…
नाशिक! पत्नी अन् प्रियकराने गोड बोलून संपवलं; अखेर गूढ समोर…
नाशिक हादरलं! व्यावसायिकाने चिमुकल्यासह घेतली रेल्वेखाली उडी…
नाशिक जिल्ह्यातील युवतीच्या खुनाचा गुन्हा काही तासांतच उघड; प्रेमसंबंधातून हत्या…

