
समृद्धी महामार्गाच्या टोलनाक्यावर गोळीबार; कर्मचाऱ्याकडे पिस्तूल….
छ. संभाजीनगर: फुलंब्री तालुक्यातील सावंगी येथील समृद्धी महामार्गावरील टोलनाक्यावर घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. दोन टोल कर्मचाऱ्यांमधील वादातून झालेल्या झटापटीत पिस्तुलातून गोळी सुटून थेट एका कर्मचाऱ्याच्या पोटात लागली. यामुळे भरत घाटगे नावाचा कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्याला छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
समृद्धी महामार्ग एक Live अनुभव अन् बरंच काही…
टोलनाक्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे पिस्तूल आले कुठून, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. पोलिसांनी ‘समृद्धी’ महामार्गाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी कर्मचाऱ्यांना पिस्तूल पुरवले नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे, हे पिस्तूल या दोन्ही कर्मचाऱ्यांकडे कसे आले याबाबत पोलीस सखोल चौकशी करत आहेत.
भरत घाटगे आणि पळून गेलेला दुसरा कर्मचारी यांच्यात काही कारणावरून जोरदार वाद झाला. वादाचे रूपांतर झटापटीत झाले. नेमक्या याच वेळी, दुसऱ्या कर्मचाऱ्याजवळ असलेल्या पिस्तुलातून गोळी सुटली आणि ती घाटगे यांच्या पोटात लागली. वादाचे नेमके कारण आणि त्यातून थेट गोळीबार का करण्यात आला, हे अजूनही अस्पष्ट आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला असून, फरार झालेल्या आरोपीचा शोध घेत आहेत.
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे, समृद्धी महामार्गावर 3000 रुपयांचा Fastag चालणार का? घ्या जाणून…
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! पुण्याहून निघालेले पती-पत्नीसह तिघे ठार…
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, चालकाला डुलकी लागली अन्…
साईबाबांचे दर्शनानंतर समृद्धी महामार्गावरून जाताना भीषण अपघात…
समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू; पाहा मृत आणि जखमींची नावे…

