
भाजप नगरसेविकेच्या मुलावर सपासप तलवारीने वार करत केली निर्घृण हत्या…
वर्धा: वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमाभागात रेती घाटाच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यात पुलगावच्या भाजपा नगरसेविकेचा मुलगा भरत नागपाल यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. टोळक्याने त्यांच्यावर तलवारीने सपासप वार केले आहेत. हा हल्ला इतका भयंकर होता की यात नगरसेविकेच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण वर्ध्यासह चंद्रपूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
भरत नागपाल हे रेती घाटचालक होते. वर्धा व वरोरा सीमेवरील वेणा नदीच्या पात्रातील रेती घाटाच्या पैशांच्या व्यवहारावरून गेल्या काही दिवसांपासून दोन गटात वाद सुरू होता. याच वादाचं पर्यावसान रविवारी रात्री उशिरा हिंसक हाणामारीत झाले. दोन्ही गटांनी एकमेकांवर तलवारीने सपासप वार केले. या तुंबळ हाणामारीत आरोपींनी भरत नागपाल यांच्यावरही तलवारीने सपासप वार केले. या हल्ल्यात नागपाल यांचा जागीच मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने नागपाल यांचा मृतदेह वेणा नदीच्या पात्रात फेकून दिला. या घटनेत अन्य तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वडनेर आणि वरोरा पोलिसांनी तातडीने धाव घेतली. वडनेर पोलिसांनी तत्परता दाखवत या प्रकरणातील तीन आरोपींना अटक केली आहे. मात्र, या हत्याकांडात सहभागी असलेले इतर आरोपी अद्याप फरार असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. मृत भरत नागपाल हे पुलगाव नगर परिषदेच्या विद्यमान भाजप नगरसेविकेचे पूत्र होते. या घटनेमुले राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही घटना वरोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, पुढील तपास केला जात आहे.
जळगाव! प्रियकराच्या मोबाईलमधील ‘अनसेंड’ मेसेजने उडवला थरकाप…
नागपूर! स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट; 12 कामगारांचा मृत्यू…
सोलापूर! एकतर्फी प्रेमातून पत्नीचा छळ, दामपत्याने संपवलं जीवन…
पुणे पोलिसांनी 9 अट्टल गुंडांना केलं तडीपार; पाहा नावे…

