हृदयद्रावक! वाढदिवसच ठरला आयुष्यातला शेवटचा दिवस; यंत्रात स्कार्फ अडकला अन् गेला जीव…

पुणे : भोर तालुक्यातील कुरंगवडी गावात वाढदिवसाचा दिवशीच महिलेचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शेतातील धान्यभरड यंत्रात स्कार्फ अडकल्याने झालेल्या दुर्घटनेत शुभांगी नीलेश राऊत (वय ४१) यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

कुरंगवडी गावात शनिवारी (ता. २१) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. शुभांगी राऊत या आपल्या कुटुंबीयांसमवेत शेतात वाटाणा आणि मसूर भरडण्याचे काम करत होत्या. धान्यभरड यंत्र सुरू असताना शुभांगी यांनी डोक्याला बांधलेला स्कार्फ आणि त्यांचे केस यंत्रामध्ये अडकले. यंत्राचा ओढा इतका प्रचंड होता की, त्या क्षणात यंत्राकडे ओढल्या गेल्या आणि गंभीर जखमी झाल्या.

crime-book
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी मोठ्या आशेने त्यांना नसरापूर येथील खासगी रुग्णालयात हलवले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, शनिवारीच शुभांगी यांचा ४१ वा वाढदिवस होता. सोशल मीडियावर आणि घरात त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात असतानाच ही बातमी धडकली आणि संपूर्ण कुरंगवडी गावावर शोककळा पसरली.

शुभांगी या माजी सैनिक रमेशदादा राऊत यांच्या सून आणि निवृत्त सैनिक नीलेश राऊत यांच्या पत्नी होत्या. त्यांच्या मागे पती, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. राजगड पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून, हवालदार मंगेश कुंभार पुढील तपास करत आहेत.

हृदयद्रावक! पोलिस भरतीसाठी सराव करताना काळाचा घाला…

हृदयद्रावक! एक नवविवाहित तर दुसऱ्या बहिणाचा विवाहापूर्वी अपघाती मृत्यू…

हृदयद्रावक! पत्नीला वाढदिवशीच समजली प्राध्यापक पतीच्या मृत्यूची बातमी…

हृदयद्रावक Video! ‘ऊसतोड रिलस्टार’च्या लव्ह स्टोरीचा करूण अंत…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!