Video: पुण्यात ‘मुळशी पॅटर्न’ थरार! मैत्रिणीला फोन लावण्यावरुन सपासप वार…

पुणे: पुणे शहरातील भारती विद्यापीठ परिसरात दोन जिवलग मित्रांमध्ये जुन्या मैत्रिणीला फोन लावण्यावरून वाद झाला, या वादातून कोयत्याने वार केल्याने दुसरा मित्र गंभीर जखमी झाला आहे. 2 फेब्रुवारीला रात्री आठ वाजता ही घटना घडली असून, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आदित्य कांबळे आणि चेतन चव्हाण (वय २३) हे दोघे चांगले मित्र आहेत. दोघेही दोन फेब्रुवारीला संध्याकाळी भारती विद्यापीठ परिसरातील उसाच्या गाडी जवळ उभे होते. गप्पा मारत असताना जुन्या मैत्रिणीची आठवण निघाली आणि त्या मैत्रिणीला फोन करण्यावरून दोघांमध्ये भांडण झाले. भांडण टोकाला गेले आणि आदित्य कांबळे याने मित्र चेतन चव्हाण याच्यावर थेट कोयत्याने वार करायला सुरुवात केली, या हल्ल्यात चेतन गंभीर जखमी झाला आहे, त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत देखील झाली असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या हल्ल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. प्रत्यक्षदर्शींनी तत्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमी चेतन चव्हाण याला तातडीने उपचारासाठी भारती विद्यापीठ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्या प्रकृतीवर डॉक्टरांकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. सध्या त्याची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे.त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत देखील झाली आहे.

crime-book
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

आरोपी आदित्य कांबळे याच्याविरोधात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गंभीर दुखापत केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. किरकोळ वादातून थेट कोयता हल्ल्यापर्यंत गेलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती.

पुणे! प्रियकराला संपवलं पण सिग्रेट अन् दारुच्या बाटलीने अडकवलं…

पुणे पोलिसांवरील ताण हलका होणार! मोठी पोलिस भरती…

पुणे! नागरिकांच्या काळजाचा थरकाप उडणारी घटना कॅमेऱ्यात कैद…

पुणे! नागरिकांच्या काळजाचा थरकाप उडणारी घटना कॅमेऱ्यात कैद…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!