पुण्याच्या सायकल स्पर्धेदरम्यान 50 सायकलस्वार एकमेकांवर आदळले…

पुणे : ‘बजाज पुणे ग्रँड सायकल टूर’ स्पर्धेदरम्यान एका खेळाडूचा सायकलवरील ताबा सुटल्याने मागून येणारे जवळपास 50 हून अधिक सायकलस्वार एकमेकांवर जोरात आदळले. या विचित्र अपघातात अनेक सायकलस्वार जखमी झाले आहेत.

पुणे जिल्हा सायकलिंग असोसिएशन आणि राज्य सरकारच्या सहकार्याने आयोजित ही आंतरराष्ट्रीय स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. मात्र, स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी अपघात झाल्याने खळबळ उडाली आहे. स्पर्धेदरम्यान सायकलचा वेग प्रचंड असल्याने मागून येणाऱ्या खेळाडूंना ब्रेक लावणे अशक्य झाले. त्यामुळे काही क्षणातच एकावर एक सायकलींचा खच पडला. यामध्ये अनेक खेळाडूंना गंभीर दुखापत झाली असून सायकलींचे अक्षरश: तुकडे झाले होते.

Police-Book
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

अपघात झाल्यानंतर तात्काळ घटनास्थळी तैनात असलेल्या रुग्णवाहिका आणि डॉक्टरांच्या पथकाने तातडीने धाव घेतली. जखमी खेळाडूंना प्रथमोपचार देऊन पुढील उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सुदैवाने, डोक्याला हेल्मेट असल्यामुळे मोठी जीवितहानी टळली असली, तरी अनेक खेळाडूंना या अपघातामुळे स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे.

तिकोना किल्ल्याजवळ अरूंद रस्त्यावर अपघात झाल्याचे समोर आले आहे. नियोजनाबाबत खेळाडूंमध्ये नाराजी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या स्पर्धेत सुरक्षेचे सर्व नियम पाळले जात असल्याचा दावा आयोजकांनी केला होता. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणावर खेळाडू एकमेकांवर आदळल्याने मार्गावरील नियोजनाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

पुणे जिल्ह्यात पोलिस भरतीसाठी आलेल्या युवकाने घेतला जगाचा निरोप…

पुणे! युवतीला हॉटेल रेटिंगचे सोपे ‘टास्क’ पडले महागात…

Video: पुणे पोलिस दलातील ‘मार्शल’ ठरले देवदूत; सीपीआर देऊन वाचवले प्राण…

पुणे! संक्रांतीच्या दिवशीच ट्रकच्या धडकेत सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!