लातूर! अल्पवयीन विद्यार्थिनी मृत्यू प्रकरणी पोलिसांनी घेतली तत्काळ दखल…

लातूर (श्रीकांत मुंडे): लातूर जिल्ह्यातील चिंचोलीराववाडी येथील जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा ४ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणी लातूर पोलिसांनी तात्काळ दखल घेत गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करून संवेदनशील, पारदर्शक व कायदेशीर तपास सुरू केला आहे.

या प्रकरणी दिनांक ५ जानेवारी २०२६ रोजी मृत विद्यार्थिनीच्या वडीलांनी दिलेल्या तक्रारीवरून एम.आय.डी.सी. पोलिस ठाणे, लातूर येथे गुन्हा रजिस्टर नंबर ०४/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम १०८, ११५(२), ३(५) तसेच अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ मधील कलम ३(२)(Va), ३(१)(r)(s) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तक्रारीनुसार, मृत मुलगी ही जुलै २०२५ पासून जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेत होती व शाळेच्या मुलींच्या वसतिगृहात वास्तव्यास होती. तक्रारीत नमूद आरोपींकडून झालेल्या मानसिक व शारीरिक छळाच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर लातूर पोलिसांनी कोणताही विलंब न करता तपासाची चक्रे तात्काळ फिरवली.

पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी दोन शासकीय पंचांच्या उपस्थितीत घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून ई-साक्ष अ‍ॅपद्वारे व्हिडिओ व छायाचित्रण करण्यात आले आहे. महिला पोलिस अधिकारी यांच्या उपस्थितीत इन-कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले असून वैद्यकीय अहवाल व प्रोव्हिजनल कॉज ऑफ डेथ प्रमाणपत्र ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच व्हिसेरा व अन्य नमुने रासायनिक विश्लेषणासाठी पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

प्राथमिक तपासात निष्पन्न झालेल्या पुराव्यांच्या आधारे आरोपी पल्लवी सचिन कणसे व लता दगडू गायकवाड यांना ६ जानेवारी २०२६ रोजी अटक करण्यात आली. आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दिनांक ९ जानेवारी २०२६ पर्यंत पोलिस कोठडी मंजूर केली आहे. या प्रकरणात शाळा, वसतिगृह व संबंधित साक्षीदारांचे सविस्तर जबाब नोंदविण्यात आले असून बी.एन.एस.एस. कलम १८३ अन्वये न्यायालयीन जबाब नोंदविण्याची कार्यवाही सुरू आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेज, शाळेचे रजिस्टर, उपस्थिती नोंदी, कर्मचारी जबाब व इतर महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत करण्यात येत आहेत.

अत्यंत संवेदनशील व समाजमन हेलावून टाकणाऱ्या घटनेचा तपास पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी समीर साळवे व त्यांच्या विशेष पथकाकडून करण्यात येत असून अपर पोलिस अधीक्षक यांच्याकडून सातत्याने देखरेख ठेवण्यात येत आहे. लातूर पोलिस प्रशासन समाजातील दुर्बल घटक, विद्यार्थी व अल्पवयीन मुलांच्या सुरक्षिततेबाबत कटिबद्ध असून अशा अमानवी व बेकायदेशीर कृत्यांविरोधात ‘शून्य सहनशीलता’ धोरण राबविले जात आहे. या प्रकरणात दोषींवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

लातूर! पोलिस अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून युवकाची आत्महत्या…

लातूर! नवऱ्याचे दुसऱ्या महिलेसोबतचे चॅटिंग सापडलं अन् पत्नीने उचलले मोठे पाऊल…

लातूर! धाब्यावर चिकन अन् दारू पाजली अन् जाळून मारलं पण कानून के हात लंबे होते है…

लातूर! फ्रेशर्स पार्टीत डान्स करताना एकमेकांना धक्का लागला अन् जीव गेला…

लातूर-सोलापूर महामार्गावर रक्तरंजित थरार; एकाची हत्या तर मैत्रिणीच्या छातीत खुपसला चाकू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!