
महिलेचे शेजाऱ्यासोबत प्रेमसंबंध अन् दोघांना नको त्या अवस्थेत पकडलं…
चंदीगड (हरियाणा): एका युवकाने आपली आई आणि तिच्या प्रियकराची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोघांची हत्या केल्यानंतर दोघांचेही मृतदेह घेऊन तो पोलिस स्टेशनला गेला होता. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवले. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
अंगूरी देवी (वय ४२) आणि प्रियकर लेखराज (वय ४५) अशी मृतांची नावे आहेत. आरोपी युवकाने त्याची आई आणि त्यांचा शेजारी राहणाऱ्याला गुरुवारी (ता. २७) नको त्या अवस्थेत रंगेहाथ पकडले आणि रागाच्या भरात त्याने दोघांचीही स्कार्फने गळा आवळून हत्या केली.

सिकंदरपूर जिल्ह्यातील राजकुमार नावाच्या युवकाने गुरुवारी रात्री त्याच्या आईला आणि शेजाऱ्याला रंगेहाथ पकडले. त्याने घरात घुसून दोघांचीही गळा दाबून हत्या केली. हत्येनंतर तो त्यांचे मृतदेह आपल्या गाडीत घेऊन शुक्रवारी सकाळी ९ वाजता थेट सिरसा येथील सदर पोलिस ठाण्यात गेला. थेट पोलिस स्टेशनला गेल्यावर पोलिसांनी त्याला थांबवले तेव्हा त्याने सांगितले की, त्याच्या आईचे आणि तिच्या प्रियकराचे मृतदेह गाडीत आहेत. “दोन्ही मृतदेह गाडीतून काढा”. पोलिसांनी गाडीची झडती घेतली तेव्हा त्यांना आत दोन मृतदेह आढळले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले आणि रूग्णालायात पाठवून दिले. आरोपीला ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत.
पोलिस चौकशीदरम्यान आरोपीने सांगितले, ‘माझ्या आईचे शेजाऱ्याशी अनैतिक संबंध होते. मला अनेक दिवसांपासून यावर संशय होता. मी माझ्या आईला यापूर्वीही अनेकदा समजावून सांगितले होते, पण ती ऐकत नव्हती. गुरुवारी रात्री मी त्यांना रंगेहाथ पकडले आणि नंतर दोघांनाही ठार मारले.’
प्रेयसीसोबत लॉजवर नवऱ्याला रंगेहाथ पकडलं; घाबरून मारली उडी…
प्रेमप्रकरणाचा ट्रँगल! डॉक्टरने पत्नीला रंगेहाथ पकडले अन् केला भयंकर शेवट…
Video: नवऱ्याला महिलेबरोबर रंगेहात पकडलं अन्…
नेत्याला रंगेहाथ पकडलं; माझ्याशी लग्न करून दुसऱ्याबरोबर मजा करतोस…
Video: नवरा कामासाठी घराबाहेर अन् पत्नीने बालावले घरी; पकडले रंगेहाथ…

