नवविवाहित युवकानं धावत्या ट्रेनसमोर मारली उडी! व्हिडीओत म्हणाला, माझी बायको…

बंगळूरू (कर्नाटक) : नवविवाहित पत्नीकडून होत असलेल्या मानसिक छळाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रामनगर येथे घडली आहे. आत्महत्येपूर्वी या पतीने आपला व्हिडीओ बनवला असून, तो व्हायरल झाला आहे. रेवंत कुमार असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. अवघ्या पाच महिन्यांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते.

रामनगर जिल्ह्यातील बिदादी परिसरात ही घटना घडली आहे. हरोहल्ली तालुक्यातील अन्नाडोड्डी गावचा रहिवासी असलेला रेवंत कुमार बिदादीतील एका कारखान्यात काम करत होता. ५ महिन्यांपूर्वीच त्याचा विवाह झाला होता. पण, लग्नानंतर पत्नीच्या त्रासाला कंटाळून मंगळवारी आत्महत्या केली. रेवंतने आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ बनवला. यात त्याने पत्नी मल्लिका हिच्यावर अतिशय गंभीर आरोप केले. तो आपल्या व्हिडीओत म्हणाला की, “हॅलो! सगळ्यांनी ऐका. माझ्या मृत्यूला फक्त आणि फक्त माझी पत्नीच जबाबदार असेल. कारण लग्नानंतर ती मला खूप त्रास देत आहे. आज मी मरतोय, कारण तिचा हा छळ आता माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे गेला आहे. तिच्यामुळे मी प्रचंड तणावात आहे. ना मला नीट काम करता येतंय, ना मी धड जगू शकतोय.”

पत्नी सुधारेल, अशी आशा होती; पण तिचे टॉर्चर तर दिवसागणिक वाढतच गेले. तिचा हा छळ सहन करून मी पूर्णपणे थकून गेलो आहे. आज मी इथे आलोय, कारण मला मरायचं आहे. त्यामुळेच हा व्हिडीओ बनवत आहे. माझ्या मृत्यूनंतर माझ्या पत्नीला कठोर शिक्षा व्हावी. तिने मला जेवढं दुःख दिलं, तेवढंच दुःख तिलाही मिळावं, अशी माझी इच्छा आहे,” असेही रेवंतने म्हटले आहे.

व्हिडीओ बनवल्यानंतर रेवंत कुमार याने समोरून येणाऱ्या रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

युवकाने नवविवाहित पत्नीचा मोबाईल तपासला अन् बसला धक्का…

नाशिक! नवविवाहित पत्नीच्या प्रियकराकडून नवऱ्याचे अपहरण करण्याचा थरारक प्रयत्न…

हृदयद्रावक! नवविवाहित मयुरीने वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी घेतला गळफास…

नवविवाहित सुनेला तिच्या प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं अन् काही वेळातचं संपवलं…

हृदयद्रावक! नवविवाहित युवतीचा बाथरूममध्ये तडफडून मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!