विवाहित महिलेशी प्रेमसंबंध अन् आत्महत्या; पाहा WhatsApp स्टेटस मेसेज…

परभणी: सेलू तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे प्रेमसंबंधातून आलेल्या नैराश्यातून एका युवकाने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी उशिरा रात्री घडली आहे. विराट खोसे (वय २५) असे या मृत युवकाचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी त्याने आपल्या व्हॉट्सॲप (WhatsApp) स्टेटसवर (Status) भावनिक संदेश ठेवून नातेवाईकांना पाठवला आणि रात्री 10:30 वाजता रेल्वेखाली मारली उडी मारली.

माणिक याचे गावातील एका विवाहित महिलेशी प्रेमसंबंध जुळले होते. संबंधित महिला पतीच्या छळाला कंटाळून माहेरी राहायला आली होती, याच काळात त्यांचे प्रेमसंबंध अधिक घट्ट होऊन त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. मात्र, त्यांच्या या नात्याला कुटुंबीयांकडून तीव्र विरोध होऊ लागला. या विरोधामुळे मानसिक तणावाखाली आलेल्या विराट खोसे याने रविवारी रात्री सुमारे 10:30 वाजता रखळगाव शिवारात धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक दीपक बोरसे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व कायदेशीर पंचनामा केला. मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून, या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

विराट खोसे याने व्हॉट्सॲप स्टेटसवर ठेवलेला मेसेज पुढीलप्रमाणे…
माझा लास्टचा मेसेज आहे. गुड बाय.. पल्लवी… तुला माझं प्रेम, माझा जीव गेल्यावरच कळेन. माझ्या जिवाला काही झालं तर त्याला जबाबदार पल्ल्वी राहिल. तीन वर्षानंतर ती माझ्या लाईफमध्ये आली. मी तिच्या लाईफमध्ये आलो नाही. पण काय करू लय प्रेम करतो मी तिच्यावर, त्यामुळं मला लय टेन्शन येतंय. पल्लवी तू टेन्शन घेऊ नको. मी मुलगी नाही, मुलगा आहे म्हणून माझ्या जीवाला काही झालं तरी कुणी येणार नाही. मुलगी असतो तर सगळ्यांनी उठाव केला असता. पण तुला मुलगा झाला तर माझं नाव त्याला ठेव. तुला विराट तुला लय आवडतंय ना… मुलगी जर झाली तर स्वामीज्ञा मला हे नाव लय आवडतय. मी जीव दिल्यावर कुणाला वाईट वाटणार नाही. फक्त माझ्या आई-वडिलांना दु:ख होईल. मी त्यांचा एकुलता एक मुलगा आहे ना… माझा अॅक्सिडेन्ट झाला तेव्हाच मी मरायला पाहिजे होतं. तीन वर्ष मला आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद… माझा आणि तुझा फोन माझ्याजवळ आहे. त्याच सगळं काही आहे. हाईड फोटो पण त्यात आहे बघ.

सांगली! प्रेमविवाह झालेल्या युवतीने संपवलं आयुष्य…

प्रेमसंबंधाच्या चर्चेला उधाण! पोलिस अधिकाऱ्यासोबत बायकोला रंगहात पकडले अन्…

नाशिक! प्रेमीयुगुलाने हातात हात घेऊन मारली रेल्वेसमोर उडी…

उपसरपंच अंखड बुडाला होता नर्तिकेच्या प्रेमात; कसा झाला शेवट पाहा…

प्रेमप्रकरणातून दुहेरी हत्याकांड! कारागृहातून सुटला अन् प्रेयसीला भेटायला गेला…

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!