
IPS विश्वास नांगरे पाटील यांचा AI चेहरा वापरून 78 लाख रुपयांना लुटलं…
छत्रपती संभाजीनगर: दहशतवाद्यांच्या खात्यावरून तुमच्या बँक खात्यात 20 लाख जमा झाल्याचा बनाव रचत सेवानिवृत्त अधिकाऱ्याला सायबर गुन्हेगारांनी 78 लाख 60 हजार रुपयांना लुटल्याची घटना घडली आहे. AI चेहरा वापरून IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीने व्हिडीओ कॉल करून वृद्धाला विश्वास ठेवण्यासाठी भाग पाडले. याप्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार (वय ७७) हे विभागीय आयुक्तालयातून सेवानिवृत्त झाले आहेत. पोलिसांचा गणवेश घातलेल्या व्यक्तीने 2 जुलै 2025 रोजी त्यांना व्हिडीओ कॉल केला. संजय पिसे असे नाव सांगून तो विश्वास नांगरे पाटील यांचा सहकारी असल्याची बतावणी केली. तुमच्या पत्नीच्या बँक खात्यात 2 कोटींचा बेहिशेबी व्यवहार झाला आहे. त्याचा संबंध दहशतवादी अब्दुल सलाम याच्यासोबत निष्पन्न झाला आहे. त्याच्याकडून तुम्हाला 20 लाख रुपये आल्याने एनआयएकडून गुन्हा दाखल करून केल्याचे खोटे सांगून घाबरवले.
पुणे गणपती मंडळांसाठी स्वतंत्र पुरवणी आणि ई-पेपरची सुविधा!
आरोपींनी तक्रारदाराला थेट आयपीएस नांगरे पाटील यांच्याशी सल्लामसलत करण्याचा सल्ला दिला. डिजिटल अरेस्टची बाब राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असल्याने कोणालाही सांगितल्यास कुटुंबाला अटक करून संपत्ती जप्त करण्यात येईल, असा इशारा दिला. यानंतर, तक्रारदाराने त्यांच्यासह पत्नीच्या नावे असलेले 78 लाख 69 हजार रुपये 2 ते 7 जुलैपर्यंत सायबर गुन्हेगारांनी दिलेल्या तीन बँक खात्यांवर पाठवले. चौकशीनंतर ही रक्कम परत देण्यात येईल, अशी थाप सायबर आरोपींनी मारली होती.
तक्रारदाराचा विश्वास संपादन करण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या विभागातून बोलत असल्याचे सांगितले. 4 जुलै रोजी व्हिडीओ कॉलवर नांगरे यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीने संवाद साधत, मराठीच असल्याचे सांगून विश्वासात घेतले होते. या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून सायबर गुन्हेगारांचा शोध घेतला जात आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
Digital Arrest! IPS विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाचा गैरवापर; कोटींचा गंडा…
पुणे! फेक प्रोफाईल तयार करून महिलेला कोट्यावधी रुपयांना फसवलं…
लग्नाळू आजी-आजोबांची उतारवयात बहरली लव्ह स्टोरी अन् एक दिवस…
Cyber Crime! पुणे शहरात सायबर फ्रॉडचे मोठे रॅकेट उघडकीस…
पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज आणि कॉल करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या…
Cyber Crime! ऑनलाईन शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून फसवणारे ताब्यात…
पुणे शहरात बनावट नोटा छापणा-या टोळीचा सायबर पथकाकडून पर्दाफाश…
सायबर मर्डर! पुण्यातील उद्योगपतीचं पटना एअरपोर्टवरून अपहरण अन् हत्या…
Cyber Crime! पुणे शहरातील ज्येष्ठ नागरिकाची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणारे ताब्यात…
Cyber Crime! पोलिसकाकाच्या खात्यातून 2.3 लाख गायब; कसे गेले पाहा…
Cyber Crime! युवतीला विवस्त्र होण्यास सांगून केलं चित्रीकरण अन्…

