विवाहीत प्रियकरच निघाला मॉडेल शीतल हिचा खूनी…

सोनीपत (हरियाणा): एका सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर आणि मॉडेल शीतल उर्फ सिमी चौधरी हिचा मृतहेद एका कालव्यात सापडल्यानंतर खळबळ उडाली होती. तिची गळा चिरून हत्या केल्यानंतर मृतदेह कालव्यात फेकणारा तिचाच प्रियकर निघाला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

शीतल उर्फ सिमी चौधरी ही 15 जूनपासून ती बेपत्ता होती. सोनीपत जिल्ह्यात एका कालव्यात तिचा मृतदेह आढळला होता. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला. त्यांना शीतलचा प्रियकर सुनील कुमार यांच्यावर संशय आला. त्यांनी सुनीलची कसून चौकशी केली. चौकशीत सुनीलने खून केल्याचे कबूल केले. पोलिसांच्या संशयातून वाचण्यासाठी त्याने शीतलला मारून गाडी कालव्यात फेकून दिली आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

शीतल ही विवाहित असून, तिला एक मुलगा आहे. पण ती नवऱ्यापासून वेगळी राहत होती. सुनील देखील विवाहित होता आणि तो आपल्या कुंटुंबापासून दूर राहत होता. पाच वर्षांआधी दोघांची ओळख झाली. दोघांमध्ये प्रेम झाले आणि जवळीक वाढली. पुढे शीलतने सोशल मीडियावर सिमी नावाने अकाऊंट सुरू केले आणि तिथे तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यात सुरूवात केली. दोघे अनेकदा एकत्र दिसले होते.

शीतलाचा सोशल मीडियावरील वाढता वावर आणि इतरांसोबतचे संबंध सुनीलला खटकत होते म्हणून त्याने शीतलला संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला असावा असा संशय पोलिसांच्या प्राथमिक तपासात आला होता. मृत्यूच्या आधी शीतल आणि सुनील एका कारमधून प्रवास करताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले. तीच गाडी नंतर कालव्यात सापडली. ती गाडी सुनीलच्या नावावर होती. गाडी कालव्यात टाकून सुनीलने पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्याचे कॉल डिटेल्स, मोबाईल लोकेशन आणि सीसीटीव्ही फुटेजवरून त्याला पकडले आहे. पोलिस व्हॉट्सअ‍ॅप चॅट, मोबाईल डेटा आणि इतर तांत्रिक तपशीलांच्या आधारे तपास करत आहेत.

पहलगामच्या दहशतवाद्यांबाबत मॉडेल एकता तिवारी हिने केला खळबळजनक दावा…

मुंबई पुन्हा हिट ऍण्ड रन, मॉडेलचा जागीच मृत्यू…

प्रसिद्ध मॉडेलची हत्या; नग्नावस्थेत सापडला मृतदेह…

मॉडेलने घातला अनेक युवकांना लाखो रुपयांचा गंडा…

अभिनेत्री प्रीती झिंटाने हुतात्मा जवानांच्या पत्नींसाठी केला मदतीचा हात पुढे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!