
पुणे शहरातील गुंडाचा सोलापूरात पहाटेच्या सुमारास एन्काऊंटर…
सोलापूर: सोलापूरातील लांबोटी गावाजवळ आज (रविवार) पहाटे तीनच्या सुमारास पुण्यातील सराईत गुंडाचा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख (वय २३) असे एन्काऊंटर सराईत गुंडाचे नाव आहे.
‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…
सोलापूर पोलिस शनिवारी मध्यरात्री शाहरुखला पकडण्यासाठी गेले होते. यावेळी शाहरूखने पळून जात असताना पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरात पोलिसांनी गोळीबार केला असता शाहरुख शेख गंभीर जखमी झाला होता. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. भल्या पहाटे गोळीबाराचा थरार घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सोलापुरातल्या लांबोटी जवळ पुणे गुन्हे शाखेच्या पथकाने आणि सोलापूर पोलिसांनी ही कारवाई केली.
शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख याच्यावर पुण्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. मागील काही दिवापासून तो सोलापुरातील लांबोटी गावाजवळ लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. शनिवारी मध्यरात्री त्याला अटक करण्यासाठी पुणे गुन्हे शाखेचे पथक लांबोटी येथे आलं होतं. शाहरुख लपलेल्या घरावर छापा मारताना आरोपी शाहरुख शेख याने पोलिसांवर गोळीबार केला. या गोळीबारला पोलिस प्रत्युत्तर देत असताना शाहरुख उर्फ अट्टी शेख गंभीर जखमी झाला. त्याला गंभीर अवस्थेत सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पुण्यातील सराईत गुंडाचा सोलापूरात अशाप्रकारे एन्काऊंटर झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरबाबत दावा करणारे PSI रणजीत कासले ताब्यात…
चिमुकलीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या आरोपीचे पीएसआय अन्नपूर्णा यांनी केले एन्काऊंटर…
महाराष्ट्रातील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने जाऊन टोळी टाकायची दरोडे…
आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर फेक, चौकशी समितीचा पोलिसांवर ठपका…
प्रेमाचा त्रिकोण! गुजरातचा प्रियकर थेट पुण्यात आला अन्…

