नवी मुंबईत धावत्या बसमध्ये शरीरसंबंध ठेवणाऱ्या दोघांना शिक्षा…

मुंबई: नवी मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या एसी बसमध्ये मागच्या सीटवर कपलने सेक्स केला होता. संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली होती. बसमध्ये शरीरसंबंध ठेवणाऱ्या जोडप्याची नुकतीच ओळख पटवण्यात आली असून, स्थानिक न्यायालयाने दोघांना प्रत्येकी २००० रुपयांचा दंड ठोठावला आहे.

संबंधित जोडप्याने बसमध्ये केलेल्या कृत्याबद्दल न्यायालयात पश्चात्ताप व्यक्त केला. यानंतर न्यायालयाने त्यांना आर्थिक दंड ठोठावून सुटका केली. या व्हिडिओमुळे महापालिका प्रशासनाने बस कंडक्टरला सतर्क न राहिल्याबद्दल आणि जोडप्याला अश्लील कृत्य करण्यापासून न रोखल्याबद्दल निलंबित केले होते. नंतर त्याला पुन्हा सेवेत घेण्यात आले. संबंधित व्हिडिओ एका दुचाकी चालकाने मोबाईलमध्ये शूट केला होता.

संबंधित घटना रविवारी २० एप्रिल रोजी संध्याकाळी नवी मुंबई मुनिसीपल ट्रान्सपोर्टच्या बसमध्ये घडली होती. ही एसी बस पनवेलवरून कल्याणच्या दिशेने जात होती. रविवारचा दिवस असल्याने बसमध्ये गर्दी कमी होती. तसेच ट्रॅफिक जास्त असल्याने बसचा स्पीडही स्लो झाला होता. अशात मागच्या सीटवर २० वय असणारं एक जोडपं बसले होते. कंडक्टर पुढे काही प्रवाशांसोबत बसले होते. अशात मागच्या सीटवर या कपलने थेट शारिरीक संबंध ठेवायला सुरुवात केली. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी स्वाराने हा सगळा प्रकार पाहिला. त्याने आपल्या फोनमध्ये अश्लील कृत्य कैद केले होते.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाहतूक शाखेने कामोठे पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी अश्लीलतेबद्दल बीएनएसच्या कलम २९६ आणि महाराष्ट्र पोलिस कायद्याच्या कलम ११० आणि ११७ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला होता. या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी जोडप्याला शोधले. न्यायालयाने जोडप्याला २००० रुपयांचा दंड ठोठावला आहे.

महाराष्ट्र हादरला! बॅंकेतील मॅनेजर नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून पत्नीची आत्महत्या…

पुणे जिल्हा तिहेरी हत्याकांडाने हादरला; मृतांमध्ये दीड वर्षांचे बाळ…

वैष्णवी हगवणे प्रकरण! पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर म्हणाले…

मोठा आरोप! वाल्मीक कराड याला जेलमध्ये व्हीआयपी ट्रिटमेंट? स्पेशल चहा, झोपायला…

विकृती! घोडीवर बलात्कार करताना cctv मध्ये कैद…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!