कुख्यात गुंड गजा मारणेची ‘मटण पार्टी’ पडली महागात; पोलिस निलंबीत…

पुणेः पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याला सांगली कारागृहात घेऊन जाताना पोलिसांच्या समक्ष ढाब्यावर मटण पार्टी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. आरोपी असूनही ढाब्यावर जेवण देणं आणि बेजबाबदारपणे वागणुकीमुळे पुणे पोलिसांचे निलंबन करण्यात आले आहे. गुंड गजा मारणेला कारागृहात नेत असताना त्याच्याबरोबर मोटारीचा ताफा होता, अशी माहिती देखील समोर आली आहे. त्याला ढाब्यावर भेटणाऱ्या सराइतासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

फक्त पोलिसांसाठी! ‘सेवानिवृत्तीनंतर पण मस्त चाललंय आमचं!’

ढाब्यावरची मटण पार्टी प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक सुरज राजगुरु, पोलिस हवालदार महेश बामगुडे, हवालदार सचिन मेमाणे, हवालदार रमेश मेमाणे, पोलिस शिपाई राहुल परदेशी यांना निलंबित करण्यात आले आहे. मोक्का कारवाई अंतर्गत गजा मारणे पुण्यातील येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. त्याला सांगली कारागृहात पाठवत असताना ढाब्यावर मटण पार्टी झाली होती.

पोलिसांना माहिती मिळताच बेजबाबदारपणे वागणुकीमुळे आता कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना कुख्यात गुंड मारणे याच्या मटण पार्टीची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. कसून चौकशीअंती दोषी आढळलेल्या एका सहायक निरीक्षकासह एकूण सहा कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्याचे कठोर आदेश त्यांनी जारी केले. शिवाय, गजा मारणे याला त्या ढाब्यावर भेटलेल्या त्याच्या साथीदारांवरही गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे.

कुख्यात गज्या ऊर्फ महाराज ऊर्फ गजानन पंढरीनाथ मारणे हा मुळशीतील एका छोट्या गावातील रहिवासी. काही वर्षांपूर्वी गज्या मारणे याचे कुटुंब कोथरूड येथील शास्त्रीनगर परिसरात राहण्यास आले. शास्त्रीनगरला आल्यावर गजा मारणे गुन्हेगारी विश्वाकडं वळाला. मिलिंद ढोले यांची हत्या करून गजा मारणे याने गुन्हेगारी विश्वात पाय ठेवले. त्यानंतर गजा मारणे याने डेक्कन, कोथरुड, सासवड, दत्तवाडी, पौड या भागात आपली दहशत पसरवली. 1988 सालच्या अखेरीस गजा मारणेवर मारामारीचा पहिला गुन्हा डेक्कन पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. त्यानंतर 1990 मध्ये डेक्कन पोलिस ठाण्यात मारामारीचे दोन तर समर्थ पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर गजा मारणेला दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते.

पुणे शहरातील चार हजार गणपती मंडळांची माहिती आता एका क्लिकवर…
www.puneganpati.com

कुख्यात गुंड गजा मारणे याच्यावर लावला मोक्का; पोलिसांनी बसवले फरशीवर…

गज्या मारणे टोळीकडून मंत्री मोहोळ यांच्या कर्मचार्‍याला बेदम मारहाण…

पुण्यातील गुंड गजा मारणे याला रिल्स बनवणं पडलं महागात…

रांजणगाव देवस्थानमध्ये विश्वस्तांच्या अनुपस्थितीत गुंड गजानन मारणेचा सत्कार…

पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या श्रीमुखात लगावली पैलवानाने…

पुणे शहरातील वारजे माळवाडीतील गुंडाची आता खैर नाही…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!