पुणे शहरात युवकाचा खून करणाऱ्या आरोपींना २४ तासाच्या आत सोलापूर येथून केले जेरबंद…

पुणे (संदिप कद्रे): जमीनीच्या वादातून युवकाचा निर्घुन खून करुन पसार झालेल्या आरोपींना मोहोळ, सोलापूर येथून २४ तासाच्या आत आंबेगाव पोलिसांनी कौशल्यपुर्ण कामगिरी करत जेरबंद केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

कात्रज येथील जमीनीच्या वादातून २०/०४/२०२५ रोजी पहाटे ०३ / ४५ वाजताचे सुमारास साईछत्र अपार्टमेन्टच्या पाठीमागील जागी, ओमसाई मित्र मंडळाशेजारी, कात्रज पुणे येथे एका युवकाचा खून केलेबाबत आंबेगाव पोलिस स्टेशन गु. रजी.नं. ६६ / २०२५ भारतीय न्याय संहीता कलम १०३, ३ (५), ११५(२), ३५१(२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयाचे तपासात सदरचा गुन्हा करणारे आरोपी निष्पण करुन तांत्रीक विश्लेषणाव्दारे सदरचे आरोपीत हे मु. कामती खु. (ता मोहोळ, जि. सोलापूर) येथे असल्याबाबत माहिती प्राप्त झाल्याने पोलिस उपनिरीक्षक- मोहन कळमकर व पोलिस अंमलदार हणमंत मासाळ, धनाजी धोत्रे, नितीन कातुर्डे असे मोहोळ येथे गेले होते. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे तसेच तांत्रीक विश्लेषण करुन गुन्हयातील आरोपीत हे मंगळवेढा ते सोलापूर हायवे रोडवर, समाधान हॉटेल समोर, मु. कामती खु, ता. मोहोळ येथे मिळून आले. त्यांना सदर गुन्हयात ताब्यात घेवून त्यांचेकडे कसोशीने तपास करता त्यांचा गुन्हयातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास अंबेगाव पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलिस निरीक्षक- स्वाती
देवधर हे करत आहेत.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे खालीलप्रमाणे-
१) अमर दिलीप साकोरे वय ४० वर्षे रा. संतोषनगर, कात्रज पुणे
२) मंदार मारुती किवळे वय ३५ वर्षे रा. नवीन वसाहत, कात्रज पुणे
३) गिरीप सुभाष बाबरे वय २६ वर्षे रा संतोषनगर, कात्रज पुणे.
४) योगेश बाबुराव डोरे वय ३५ वर्षे रा. खोपडेनगर कात्रज पुणे.

सदरची कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग पुणे प्रविणकुमार पाटील, पोलिस उपआयुक्त परिमंडळ-२ पुणे स्मार्तना पाटील, सहा. पोलिस आयुक्त, स्वारगेट विभाग पुणे राहुल आवारे यांचे मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने, सहाय्यक पोलिस निरीक्षक- स्वाती देवधर, भोजलींग दोडमीसे, पोलिस उपनिरीक्षक मोहन कळमकर, राजेंद्र वंजारी, पोलिस अंमलदार राजेश गोसावी, हणमंत मासाळ, गणेश दुधाने, प्रसाद टापरे, चेतन गोरे, निलेश जमदाडे, अवधुत जमदाडे, धनाजी धोत्रे, प्रमोद भोसले, सुभाष मोरे, नितीन कातुर्डे, योगेश जगदाळे हरीश गायकवाड, आदिनाथ देवकर, प्रकाश विटेकर यांच्या पथकाने केली आहे.

पुणे! स्वारगेट पोलिसांनी सराईत गुन्हेगारास केले जेरबंद…

पुणे! आईने स्वतःचं प्रेमप्रकरण लपविण्यासाठी प्रियकराला मुलीसोबत ठेवायला लावले अनैतिक संबंध…

पुणे! आईने 10 वर्षांनी झालेल्या दोन चिमुकल्यांना पाण्याच्या टाकीत बुडवून मारलं अन्…

Cyber Crime! पुणे शहरातील ज्येष्ठ नागरिकाची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणारे ताब्यात…

पुणे! पत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला पतीचा काटा; अनैतिक संबध…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!