
क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांना दीड लाख रुपयांची लाच घेताना पकडले रंगेहात…
परभणी : परभणी जिल्ह्यात एसीबीकडून मोठी कारवाई करण्यात आली असून, जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे एसीबीच्या जाळ्यात अडकल्या आहेत. स्विमिंग पूल बांधण्यास परवानगी देण्यासाठी कविता नावंदे यांनी अडीच लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यातील, दीड लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे.
परभणी जिल्ह्यातील क्रीडा विभागात लाचप्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. एका क्रीडा स्पर्धेचे बिल आणि स्विमिंग पुल मान्यतेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी लाच मागितली होती. कविता यांनी या मंजुरीसाठी संबंधितांकडे अडीच लाख रुपयांची लाच मागितली होती. दीड लाख रुपये स्वीकारताना त्यांना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले आहे.
दरम्यान, मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला पेन्शनसाठी मागितलेले पैसे असो की, क्रीडा कर्मचाऱ्यालाही क्रीडा स्पर्धेचे बिल काढण्यासाठी मागितलेली पैसे असो अशा अनेक आर्थिक गैर व्यवहाराचे आरोप त्यातच नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदारांनी लावलेली लक्षवेधी चर्चेत असतानाच परभणीच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांना दीड लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले आहे. सध्या त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयामध्ये नेण्यात आले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया ही सुरू आहे
कविता नावंदे यांच्यावर यापूर्वीही गैरव्यवहारांचे अनेक आरोप करण्यात आले होते. तर, नुकतेच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही जिल्ह्यातील 2 आमदारांनी त्यांच्या कारभाराबद्दल विधिमंडळ सभागृहात लक्षवेधी मांडली होती. त्यातच, एबीसी अधिकाऱ्यांना धाड टाकून त्यांना 1.5 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे.
पोलिस दलात खळबळ! लाचखोर एपीआय, पीएसआयसह तिघांवर गुन्हा दाखल…
साताऱ्यात लाच घेणाऱ्या न्यायाधीश प्रकरणात नवा ट्विस्ट, पोलिस अधिकारी…
निवृत्त कॉन्स्टेबलच्या घरावर छापा टाकला अन् मिळालं मोठं घबाड…
मोठं घबाड! जंगलात कारचा दरवाजा उघडला अन् सोनं, पैसे पाहून पोलिसही चक्रावले…
शेतकऱ्याकडून लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याच्या घरात मिळालं घबाड…

