
भावांनो, तुम्ही लग्न करा, पण दोन्ही गोष्टी घडल्या नाही, तर तुम्हालाही…
भोपाळ (मध्य प्रदेश): आई आणि पत्नीच्या भांडणाला कंटाळून एका युवकाने रेल्वेतून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नरेंद्र रजक (वय 27, रा. श्रीराम कॉलनी, गुना) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. बळवंत नगर येथे त्याने रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. पोलिस पुढील तपास करत आहेत.
नरेंद्र रजक याने आत्महत्येपूर्वी त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केली होती. यामध्ये तो पत्नी आणि आईच्या भांडणामुळे आत्महत्या करत असल्याचे सांगत आहे. तो म्हणाला की, भावांनो, तुम्ही लग्न करा, पण आधी आईची आणि भावी पत्नीची ओळख करून द्या. दे. दोन्ही गोष्टी घडल्या नाही, तर तुम्हालाही माझ्याप्रमाणे आत्महत्या करावी लागेल आणि जीवनात कोणताही मार्ग उरणार नाही. मी रेल्वे रुळांवर आत्महत्या करत आहे. मला आता जगायचे नाही. मला माझे जीवन इथेच संपवायचे आहे. मला माझ्या आयुष्यात खूप त्रास झाला आहे.’
नरेंद्र रजक याचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. नरेंद्र हा त्याची आई आणि पत्नीमध्ये सुरू असलेल्या मतभेदांमुळे त्रासला होता. कौटुंबिक कलहाने त्याला इतके तोडले की त्याने स्वतःचे जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. नरेंद्र याच्या आत्महत्येनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
IT मॅनेजरनं Live Video करत छळाला कंटाळून संपवलं आयुष्य…
नाशिकमध्ये पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या; चिठ्ठीत म्हटले…
मैत्रिणीच्या छळाला कंटाळून व्यावसायिकाची आत्महत्या; सुसाईड नोट समोर…
एकतर्फी प्रेम! बीएचएमएसच्या विद्यार्थिनीची धमक्यांना कंटाळून आत्महत्या…
पुणे जिल्ह्यात सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या…

