
संतापजनक! बापाने चार महिन्यांच्या चिमुकलीचा पाळण्यातच आवळला गळा…
मुंबईः घाटकोपरमध्ये बापाने मुलगी झाल्याच्या तिरस्कारातून अवघ्या चार महिन्यांच्या बाळाची पाळण्याची दोरीने गळा आवळून ठार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. संजय बाबू कोकरे या बापाला पंतनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
मृत बाळाची आई कामानिमित्त घराबाहेर गेल्यानंतर नराधम बापाने पाळण्याच्या दोरीने निष्पाप 4 महिन्यांच्या मुलीचा गळा आवळून हत्या केली. घाटकोपरच्या कामराजनगर परिसरात या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. मुलगी झाल्याच्या तिरस्कारातून पोटच्या मुलीचा खून केला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, बापाला अटक केली आहे.
बाळाची आई शनिवारी (ता. १) काही वेळ कामानिमित्त घराबाहेर गेल्याचे लक्षात येताच संधीचा फायदा घेत संजय कोकरे याने पाळण्याच्या दोरीने आपल्या मुलीचा गळा आवळला. काही वेळानंतर आई घरी परतल्यानंतर बाळ हालचाल करत नसल्याचे तिला लक्षात आले. तिने आरडा ओरड केल्यानंतर हा प्रकार समोर आला . पोलिसांना ही बातमी कळताच घटनास्थळी धाव घेत पंतनगर पोलिस ठाण्यातील पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली. पोलिस पुढील तपास करत आहेत.
संतापजनक! बापाने ३ महिन्यांच्या चिमुकलीला फरशीवर आपटून घेतला जीव…
लेकीचे लग्न चार दिवसांवर असतानाच बापाने तोंडात गोळ्या घालून केली हत्या…
पुणे जिल्हा हादरला! बापानेच केला स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार…
प्रेमविवाह केल्यामुळे चिडलेल्या बापाने केली मुलाची हत्या…
संतापजनक! बापाने चिमुकलीला जमीनीवर जोरात आपटून मारले…

