विवाहित महिलेचा खून केल्यावर प्रियकराने केला मृतदेहावर बलात्कार…

नागपूर: नागपूर हुडकेश्वर पोलिस स्टेशन हद्दीतील बलात्कार आणि हत्या प्रकरणात आरोपीने मृतदेहावर बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. विवाहित प्रेयसीने शारीरिक संबंधास नकार दिल्यामुळे प्रियकराने तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर तिच्या मृतदेहावर बलात्कार केला. महिलेची मुलगी शाळेतून घरी आल्यानंतर हे अमानवीय कृत्य उघडकीस आले. पोलिसांनी रोहित गणेश टेकाम (वय २५) या आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहित महिला (वय ३२) ही हुडकेश्वर खुर्दमध्ये राहायची. ती मूळची मध्यप्रदेशची असून कामाच्या शोधात सहा वर्षांपूर्वी पतीसह नागपुरात आली होती. तिचा पती सकाळी ढाब्यावर कामाला गेल्यानंतर थेट मध्यरात्री एक वाजता घरी येत असे. आरोपी रोहित टेकाम हा बांधकाम मिस्त्री असून दोन वर्षांपूर्वी तो हुडकेश्वर खुर्द येथील एका इमारतीच्या बांधकामावर होता. त्यावेळी रोहितची महिलेसोबत ओळख झाली होती. या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. पती घरी नसताना रोहित नेहमी तिला भेटायला येत होता. गुरुवारी पती कामावर गेल्यानंतर महिलेने रोहितला घरी बोलावले. तो महालगाव कापसीवरुन काम सोडून तिच्या घरी आला. तिने दारुची बाटली आणण्यास सांगितली होती. दोघांनी एकत्र दारु प्यायली आणि जेवण केले. यानंतर रोहितने संजनाकडे शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने त्याला नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या रोहितने दारुच्या नशेत त्याने तिला मारहाण केली. तरीही तिने संबंधासाठी नकार दिला. शेवटी रोहितने तिच्याच ओढणीच्या साहाय्याने तिचा गळा आवळला आणि खून केला. महिलेचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेहावर बलात्कार केला आणि पळ काढला. सायंकाळी मुलगी शाळेतून घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

हुडकेश्वर पोलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला. वैद्यकीय अहवालातून मृतदेहावर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले. महिलेच्या मोबाईलवरील कॉल रेकॉर्डिंगवरुन पोलिसांनी रोहितला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

संतापनजक! प्रेमविवाहानंतर मित्रांना बोलवून पत्नीवर सामूहिक बलात्कार अन्…

एकतर्फी प्रेमातून युवतीवर बलात्कार करून केला खून अन् मृतदेह…

धक्कादायक! मूल होत नसल्याने भोंदूबाबासह दिराने केला सामूहिक बलात्कार…

धक्कादायक! नवऱ्यासमोर महिलेवर ५ जणांकडून सामूहिक बलात्कार…

पुणे शहरात 85 वर्षीय वृद्ध महिलेवर 23 वर्षीय नराधमाने केला बलात्कार…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!