एमपीडीए ७६! हडपसरमधील अट्टल गुन्हेगारावर स्थानबध्दतेची कारवाई…

पुणे (संदीप कद्रे): हडपसर पोलिस ठाणे परिसरात दहशत माजविणा-या, अट्टल गुन्हेगारावर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी एम.पी. डी. ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई केली आहे.

पुणे पोलिस आयुक्तालयातील हडपसर पोलिस स्टेशनचे हद्दीमध्ये गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार अभिषेक उर्फ नयन हरिदास भोसले (वय १९ वर्षे, रा. शेख जिवनबापू चाळ जवळ, स्मशानभूमी रोड, शेवाळवाडी, पुणे, ता. हवेली, जि. पुणे) हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने साथीदारांसह हडपसर पोलिस स्टेशनच्या हद्दीत चाकु, लोखंडी कोयता या सारख्या जीवघेण्या घातक हत्यारांसह दुखापतीसह जबरी चोरी,जबरी चोरी,खंडणी, दुखापत, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. मागील ०५ वर्षामध्ये त्याचेविरूध्द ०५ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे सदर परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करणेस धजावत नव्हते.

प्राप्त प्रस्ताव व सह कागदपत्रांची पडताळणी करुन पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी अभिषेक उर्फ नयन हरिदास भोसले याच्या विरुध्द एम. पी. डी. ए. कायद्यान्वये नागपुर मध्यवर्ती कारागृह, नागपुर येथे १ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश पारीत केले आहेत. अभिषेक उर्फ नयन हरिदास भोसले यास स्थानबध्द करण्यामध्ये रविंद्र शेळके वरिष्ठ पोलिस निरीक्षक, हडपसर पोलिस स्टेशन, पुणे व चंद्रकांत बेदरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पी.सी.बी.गुन्हे शाखा, पुणे शहर यांचे आधिपत्याखाली पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार यांनी सदरची कामगिरी पार पाडली.

पोलिस आयुक्त, पुणे शहर यांनी कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे. पोलिस आयुक्त यांनी चालु वर्षामध्ये दहशत निर्माण करणा-या व सक्रिय अट्टल गुन्हेगारांवर एम.पी.डी.ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेच्या ७६ कारवाया केल्या आहेत. यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांचे कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 75वी एमपीडीएची कारवाई…

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 74वी एमपीडीएची कारवाई…

शिवाजीनगर पोलिस ठाणेकडील गुन्हेगारावार एमपीडीए अंतर्गत कारवाई…

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचे एमपीडीए कारवाईचे अर्ध शतक…

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का अंतर्गत १०५वी कारवाई…

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचे ३६० दिवसात मोक्काचे शतक!

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!