युवतीची क्रूरपणे हत्या, निर्वस्त्र, बरगड्या तुटलेल्या अन् संपूर्ण शरिरावर जखमा…

लखनौ (उतर प्रदेश): अयोध्यातील एका गावात २२ वर्षीय युवतीची क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. युवतीवर बलात्कार झाला की नाही? हे शवविच्छेदन अहवालानंतर समजू शकेल. युवतीच्या बरगड्या तुटलेल्या होत्या आणि शरीरावर ३० हून अधिक जखमा होत्या. शरीरावरील जखमांवरून तिच्यासोबत झालेल्या अमानुषतेचे स्पष्ट होते.

एका गावातील गतिमंद तरुणी गुरुवारी रात्री गावातील भंडाऱ्यात गेली होती. शनिवारी दुपारी तिचे निर्वस्त्र शव गावाबाहेर एका कोरड्या नाल्यात सापडले. तिचे हात-पाय झाडाच्या वेलींनी बांधले होते. तिच्या खासगी अवयवांवरही खोल जखमा होत्या. युवतीवर बलात्कार करून तिची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. रक्तस्त्राव व अवयवांची स्थिती पाहून तज्ज्ञांनी या घटनेत दोन किंवा अधिक आरोपी सहभागी असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

सीओ अयोध्या आशुतोष तिवारी यांनी सांगितले की, अद्याप शवविच्छेदन अहवाल प्राप्त झालेला नाही. चार-पाच संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली जात आहे. मृतदेहाच्या स्थितीवरून बलात्काराचा संशय व्यक्त करण्यात येत असला तरी शवविच्छेदन अहवाल आल्यावरच सत्य स्पष्ट होईल.

दरम्यान, युवतीच्या हत्येच्या प्रकरणाची दखल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतली आहे. त्यांनी श्रम आणि रोजगार राज्यमंत्री यांना पीडित कुटुंबाशी भेट घेण्यासाठी तरुणीच्या घरी पाठवले आणि शक्य तितकी मदत करत न्याय मिळवून देण्याचा विश्वास दिला. मुख्यमंत्र्यांनी पीडित कुटुंबाशी फोनवरही संवाद साधला आहे.

गोव्यात युवतीवर पाच जणांकडून रात्रभर सामूहिक बलात्कार…

महिलेला मदतीच्या बहाण्याने अंधारात घेऊन गेले अन् केला सामूहिक बलात्कार…

धक्कादायक! डॉक्टर महिलांना गुंगीचे औषध देऊन करायचा बलात्कार अन्…

संतापजनक! महिलेवर अमानुषपणे बलात्कार अन् शरीरात ठोकले खिळे…

धक्कादायक! तान्हुल्या बाळासमोरच सासरा, दिर आणि मामे भावाने केला बलात्कार अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!