पुणे! पोलिसाच्या मारहाणीनंतर थेट कोमात; शुद्धीवर आल्यानंतर गुन्हा दाखल अन् निलंबीत…
पुणे : कौटुंबिक वादातून पत्नीला बेदम मारहाण करणाऱ्या एका पोलिस अंमलदाराला अडवणे एका निष्पाप कार चालकाला भलतेच महाग पडले आहे. संतापलेल्या पोलिसाने मध्यस्थी करणाऱ्या चालकाच्या डोक्यात लाकडी काठीने प्रहार केल्यानंतर तो चालक जागीच बेशुद्ध होऊन थेट कोमात गेला होता. तब्बल अडीच महिन्यांच्या उपचारांनंतर तो शुद्धीवर आला आणि त्याने दिलेल्या जबाबावरून पोलिसावर गुन्हा दाखल करण्यात आला […]
अधिक वाचा...पुणे! येरवडा कारागृहात झाली मैत्री अन् बाहेर आल्यावर केलं मोठं कांड…
पुणे : येरवडा मध्यवर्ती कारागृहात बसून आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायबर गुन्ह्यांची नेटवर्कचा पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. शेअर मार्केटमध्ये मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याला तब्बल ८६ लाख रुपयांना गंडवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या हाय-प्रोफाईल फसवणूक प्रकरणात पोलिसांनी येरवडा जेलमध्ये भेटलेल्या अविनाश ज्ञानोबा बाकलिकर (वय २८, रा. लातूर) आणि तेजस ज्ञानोबा लोखंडे (वय […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात युवकाची सपासप वार करून निर्घृण हत्या; थरार CCTV कॅमेऱ्यात कैद…
पुणे: पुणे-सातारा महामार्गावरील सारोळा (ता. भोर) या गावात एका युवकाची चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली आहे. या थरारक हत्येचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी राजगड पोलिसांनी तातडीने सूत्रे हालवत स्थानिक नागरिकांच्या मदतीने पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या […]
अधिक वाचा...शिल्पा गवारे यांच्या मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण; मोठा खुलासा समोर…
पुणे: पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड परिसरात एका विवाहित महिलेने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना गुरुवारी उघडकीस आली. माहेरहून पैसे आणण्यासाठी आणि वडिलांच्या मालमत्तेत हिस्सा मिळवण्यासाठी सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या सततच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून महिलेने गळफास घेऊन जीवन संपवले होते. गुरुवारी (ता. २७) मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास वाकड येथील ईशान सोसायटीमधील ‘प्रथम’ बंगल्यात ही घटना उघडकीस आली. […]
अधिक वाचा...पुणे! चेंबरमध्ये अडकून दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू; घटनेची पुनरावृत्ती…
पुणे : पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी प्राधिकरणातील लोकमान्य हॉस्पिटलजवळ एका चेंबरमध्ये अडकून दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता. २६) मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर दोघांनाही चेंबरमधून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित करून मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी पाठवून दिले. कामगारांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचे […]
अधिक वाचा...अडीच लाखांचे दागिने चोरून कामगार पसार…
पुणे : मालकाची नजर चुकवून सराफीच्या दुकानातून सुमारे अडीच लाख रूपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि मूर्ती चोरून कामगार फरार झाला आहे. दाखल गुन्ह्यात फरासखाना पोलिसांकडून त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे. याबाबत मालकाने फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे शुक्रवार पेठेतील सोन्या मारूती चौकात मेसर्स चिमणलाल बभूतमल अॅण्ड कंपनी नावाचे सोन्याच्या दागिन्यांचे दुकान […]
अधिक वाचा...पतीला जिवंत गाडण्याचा बारामतीत अभूतपूर्व प्रकार…
बारामतीः पतीच्या सततच्या मारहाणीमुळे संतापलेल्या पत्नीने, पतीची हत्या करून त्याला जिवंत गाडण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर, बारामती परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिस चौकशीत पत्नीने या नृशंस घटनेमागचे खुलासे केले आहेत. शर्मिला जगताप, असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे, असे पोलिसांनी सांगितले. पती आपल्याला रोज मारहाण करायचा आणि आपल्याला नोकरी करू देत नव्हता, […]
अधिक वाचा...पुणे शहरातील कसबा पेठ हादरली! नवऱ्याने दाबला रिव्हॉल्व्हरचा ट्रिगर अन्…
पुणेः शहरातील फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भैरवनाथ मंदिराजवळ पती-पत्नीतील कौटुंबिक वाद विकोपाला गेल्यानंतर, पतीने स्वतःवर गोळी झाडून घेतली. या घटनेत पतीच्या उजव्या हाताला गोळी लागल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, पतीने खरोखरच स्वत:वर गोळी झाडून घेतली का, याबाबत पोलिसांना शंका आहे. त्यामुळे या घटनेचा खोलवर तपास चालू आहे,. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये झालेला वाद इतका […]
अधिक वाचा...पुणे! जुन्नरच्या अत्याचार प्रकरणात धक्कादायक माहिती समोर…
पुणे : पिंपळवंडी (ता. जुन्नर) येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. आरोपीने शेजारीच राहणाऱ्या चिमुकलीवर अत्याचार केला अन् तिची हत्या केली, अशी माहिती समोर आली होती. पण नराधमाने आधी चिमुकलीचा जीव घेतला अन् त्यानंतर चिमुकलीवर अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. चौथीत शिकणारी […]
अधिक वाचा...पुणे! व्हॉट्सऍप स्टेटस ठेवण्याच्या क्षुल्लक वादातून विद्यार्थ्याची हत्या…
पुणे : व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवण्याच्या क्षुल्लक वादातून १२वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या डोक्यात हातोडा मारून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. नील विजय नाईक (वय १७, रा. श्रावणधारा, कोथरूड) असे हत्या झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो १२ वीच्या वर्गात शिकत होता. मिळालेल्या माहितीनुसार, नील आणि आरोपी […]
अधिक वाचा...
