लष्करातील बडतर्फ जवान चंदू चव्हाणला जामीन मंजूर…
नाशिक : भारतीय लष्करातून बडतर्फ करण्यात आलेल्या चंदू चव्हाण यास नाशिक रोड सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. गेल्या जुलै महिन्यात त्यास देवळाली कॅम्प पोलिसांनी अटक केली होती. चंदू चव्हाण याने सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय सैन्याची बदनामी करीत जवानांना वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात चिथावणी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. चंदू बाबूलाल चव्हाण (रा. मोहाडी, जि. धुळे) असे लष्करातील […]
अधिक वाचा...नाशिक! अंबड पोलीस ठाण्याने वाहनांच्या फसवणुकीचा गुन्हा केला उघड…
नाशिक (गणेश शेंडे) : नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने उल्लेखनीय कामगिरी करत दोन चारचाकी वाहनांच्या फसवणुकीचा गुन्हा उघड केला असून, १७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. फिर्यादी अदिती नितेश भामरे (वय २८, रा. सिडको, अंबड, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी लोकेश कुंदन गाजरे व त्याची आई यांनी संगनमत […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये Digital Arrest च्या नावाखाली कोट्यावधींची फसवणूक…
नाशिक : नाशिकमध्ये डिजिटल अरेस्टच्या (Digital Arrest) माध्यमातून एका ज्येष्ठ नागरिकाला 6 कोटी रुपयांना तर दुसऱ्या ज्येष्ठ नागरिकाला 72 लाख रुपयांना फसविल्याची घटना घडली आहे. आर्थिक गैरव्यवहार आणि अश्लील फोटो व्हायरल झाल्याचे सांगत डिजिटल अरेस्ट केले आणि हे पैसे उकळले आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. सायबर चोरट्यांनी दोन्ही घटनेत भारताचे […]
अधिक वाचा...नाशिक! सावत्र आईने अल्पवयीन मुलासोबत ओलांडल्या मर्यादा…
नाशिक : नाशिक शहरातील उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत आई अन् मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या सावत्र मुलासोबत नको ते कृत्य केले आहे. पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत सावत्र आईवर गुन्हा दाखल केला आहे. नाशिक शहरातील गायकवाड मळा परिसरात ही घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलाच्या सख्ख्या आईने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, तिचा […]
अधिक वाचा...नाशिक! देवदर्शनासाठी जाणाऱ्या व्यक्तीवर पहाटेच्या सुमारास हत्या…
नाशिक: नाशिक रोडच्या जय भवानी रोड परिसरात आज (मंगळवार) पहाटेच्या सुमारास एका व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नाशिक रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. अमोल मेश्राम असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. आज पहाटेच्या वेळी ते मंदिरात दर्शनासाठी जात होते. यावेळी त्यांच्यावर अचानक अज्ञाताने कोयत्याने वार […]
अधिक वाचा...नाशिक! गर्लफ्रेंडमुळे तीन वर्ष जगायला मिळाली; लव्ह यू अन् गूड बाय…
नाशिक: एका इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्याने कॉलेजच्या इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. आपण तीन वर्षांपूर्वी आत्महत्या करणार होतो. पण गर्लफ्रेंडमुळे आणखी तीन वर्षे जगायला मिळाली, अशा आशयची इन्स्टाग्राम पोस्ट लिहून युवकाने जीवन संपवले आहे. युवक शिक्षणात ९५ टक्के मार्क्स मिळाले होते. हुशार विद्यार्थ्याने अशाप्रकारे टोकाचं पाऊल उचलल्याने हळहळ व्यक्त […]
अधिक वाचा...नाशिक पोलिस दलात मोठे फेरबदल; पाहा नावे…
नाशिक : नाशिक पोलिस दलातील एकाचवेळी 12 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आगामी नाशिक महापालिका निवडणुका जाहीर होण्याआधी पोलिसांच्या बदल्या झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत आहे. या वाढत्या गुन्हेगारीला आटोक्यात आणण्यासाठी पोलिस दलात फेरबदल केल्याची माहिती आहे. नाशिक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी हा निर्णय […]
अधिक वाचा...नाशिक! माझ्या हॉटेलमध्ये कॉलगर्ल्स पुरवल्या जातात, आता तुम्ही तेच काम करा…
नाशिक : नाशिक शहरातील म्हसरूळ परिसरात एक व्यावसायिक फोटोग्राफर युवती व तिच्या मैत्रिणीला हॉटेलमध्ये जबरदस्तीने डांबून, पिस्तुलाचा धाक दाखवत अनैतिक व्यवसाय करण्याबाबत सांगितल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात हॉटेलचालकासह त्याच्या साथीदाराविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सुमारे चार महिन्यांपूर्वी घडलेल्या या घटनेत पीडित युवतीने सुरुवातीला भीतीपोटी तक्रार केली नव्हती. […]
अधिक वाचा...युवकाने नवविवाहित पत्नीचा मोबाईल तपासला अन् बसला धक्का…
नाशिक: युवतीने आपल्या मैत्रिणीसोबत समलिंगी विवाह केल्यानंतर युवकासोबत लग्न करत त्याची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. युवतीसह तिच्या आई-वडिलांच्या विरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. युवकाला लग्नानंतर पत्नीच्या वागण्यात विचित्रपणा जाणवू लागला. पत्नीच्या अंगाला हात लावल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिल्याचा फिर्यादीत आरोप करण्यात आला आहे. युवकाने पत्नीचा […]
अधिक वाचा...नाशिक! नवविवाहित पत्नीच्या प्रियकराकडून नवऱ्याचे अपहरण करण्याचा थरारक प्रयत्न…
नाशिक : नाशिक शहरातील सातपूर परिसरात भरदिवसा एका युवकाचे अपहरण करण्याचा प्रकार घडला असून, युवकाने प्रसंगावधान राखून अपहरणकर्त्यांच्या तावडीतून पळ काढून थेट पोलिस ठाणे गाठल्याने अनर्थ टळला. या प्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मोबाईल फुटेजच्या आधारे पोलिस तपास करत आहेत. तेजस ज्ञानदेव घाडगे (वय 24, रा. त्र्यंबकराज नगर, ध्रुवनगर, नाशिक) याने […]
अधिक वाचा...
