अभिनेता सलमान खान याला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी…
मुंबईः अभिनेता सलमान खान याला पुन्हा एकदा धमकी आली आहे. मुंबईच्या वरळी येथील वाहतूक विभागाच्या व्हॉट्सऍप नंबरवर सलमानसंदर्भातला धमकीचा मेसेज आला आहे. तसेच, याच मेसेजमध्ये सलमान खानला घरात घुसून मारण्याचीही धमकी देण्यात आली आहे. दरम्यान, सलमान खान धमकी प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. अभिनेता सलमान खान याला […]
अधिक वाचा...प्रसिद्ध अभिनेत्याला केली अटक; मानवी तस्करी प्रकरणाचा पर्दाफाश…
मुंबई : वेब सिरीज आणि आणि टीव्ही मालिकांमध्ये भूमिका साकारलेल्या एका प्रसिद्ध अभिनेत्याने 60 जणांची फसवणूक केली असून त्याला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी मोठ्या मानवी तस्करी प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. मनीष ग्रे उर्फ मॅडी असे त्याचे नाव असून, त्याला या टोळीचा मुख्य सूत्रधार (किंगपिन) म्हणून अटक करण्यात आली आहे. मानवी तस्करी प्रकरणात अभिनेता […]
अधिक वाचा...मुंबई पोलिस दलातील Psi सागर धुमाळ यांचे निधन
पुणे: मुंबई पोलिस दलातील पोलिस उपनिरीक्षक सागर विलास धुमाळ (वय ३२) यांचे सोमवारी (ता. ७) अल्पशा आजाराने वाशी येथील एमजीएम रुग्णालयात निधन झाले. सागर धुमाळ यांच्या निधनामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, पोलिस दलातही हळहळ व्यक्त केली जात आहे. सागर धुमाळ यांचे मुळ गाव पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपळे धुमाळ. शेतकरी कुटुंबातील त्यांना जन्म. गरिब […]
अधिक वाचा...मुंबई पोलिसांनी हत्येचा कट उधळला; बिश्नोई गँगच्या 5 जणांना अटक…
मुंबई : मुंबई पोलिसांनी बिश्नोई टोळीच्या गुंडांच्या मुसक्या आवळल्या आहेत. मुंबईतील एका उद्योगपतीच्या हत्येसाठी बिष्णोई गँगचे शूटर्स मुंबईत आले होते. मात्र, मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने 5 आरोपींना अंधेरी येथून अटक केली आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर हल्ला केल्यानंतर पोलिसांनी बिश्नोई गँगच्या काही गुंडांना अटक केली होती. त्यानंतर राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या […]
अधिक वाचा...मुंबई पोलिसातील IPS डॉ. सुधाकर पठारे यांचे तेलंगणात अपघाती निधन…
मुंबई : आयपीएस अधिकारी आणि मुंबई पोलिस दलातील डीसीपी सुधाकर पठारे यांचे रस्ते अपघातामध्ये निधन झाले आहे. तेलंगणातील श्रीशैलम येथून पठारे नागरकुरलूकडे जात असताना त्यांच्या कारचा अपघात झाला. सुधाकर पठारे हे 2011 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. सुधाकर पठारे यांच्या अपघाती निधनामुळे महाराष्ट्र पोलिस दलामध्ये शोककळा पसरली आहे. सुधाकर पठारे यांचे पोस्टिंग सध्या मुंबई पोलीस […]
अधिक वाचा...साईबाबाच्या दर्शनासाठी पायी जात असलेल्या पोलिसकाकाचा वाटेतच मृत्यू…
मुंबई : मुंबईहून शिर्डी साईबाबाच्या दर्शनासाठी पायी जात असलेल्या एका सहाय्यक पोलिस निरीक्षकाचा वाटेतच ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांची साई दर्शनाची इच्छा अपुरीच राहिली. प्रफुल सुर्वे असे मृत्यू झालेल्या या पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. ते अंधेरी पोलिस ठाण्यात कार्यरत होते. नवीन वर्षातील पहिल्याच महिन्यात मुंबईहून शिर्डी साईबाबाच्या दर्शनासाठी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेत […]
अधिक वाचा...वाहनधारकांना मोठा दिलासा! डिजिलॉकर आणि एम परिवहनवरील डिजिटल कागदपत्रे ग्राह्य…
मुंबईः डिजिलॉकर आणि एम परिवहन यावरील डिजिटल कागदपत्रे ग्राह्य धरण्याबाबतचे आदेश मुंबईतील सर्व वाहतूक पोलिसांना देण्यात आले आहेत. वाहतूक पोलिस ही कागदपत्रे ग्राह्य न धरता वाहनचालकांवर कारवाई करत होते, याप्रकरणी वाहनधारकांनी वाहतूक पोलिस आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी वाहनधारकांना दिलासा दिला आहे. वाहतूक सहपोलिस आयुक्तांनी डिजिटल कागदपत्रे ग्राह्य धरण्याचे लेखी आदेश दिले आहेत. वाहन चालकांनी वाहनाची […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! पोलिसकाकाने घेतला जगाचा निरोप…
मुंबई : विरारच्या अर्नाळा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक (PSI) रतिकांत भद्रेशेट्टे (वय 35) यांनी मंगळवारी (ता. १७) दुपारच्या सुमारास बोळीज येथील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. घरच्या छताच्या हुकला चादरीच्या सहाय्याने गळफास घेऊन त्यांनी जीवन संपवले. या घटनेमुळे पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. रतिकांत भद्रेशेट्टे यांच्या मागे पत्नी […]
अधिक वाचा...टपाली मतदान करताना फोटो काढणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यावर कारवाई…
मुंबई: पोलिस आणि सरकारी कर्मचारी निवडणुकीच्या कर्तव्यावर 20 नोव्हेंबर रोजी असल्याने त्यांना मतदान करणे शक्य नसते. या पार्श्वभूमीवर टपाली मतदानाद्वारे पोलिसांना मतदान करण्याची सुविधा निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. मात्र, यादरम्यान टपाली मतदान प्रक्रियेची गोपनियता भंग झाल्याचा प्रकार समोर आला आहे. टपाली मतदान प्रक्रियेची गोपनियता भंग केल्याप्रकरणी मुंबई पोलिस दलातील एका शिपायावर गुन्हा दाखल […]
अधिक वाचा...Video: मोबाईल चोराला मिळाले पत्नीचे प्रायव्हेट व्हिडीओ अन् पुढे…
मुंबई : एका 25 वर्षीय डिलिव्हरी बॉयचा मोबाईल अज्ञात व्यक्तीने सुमारे महिनाभरापूर्वी चोरला होता. चोराला मोबाईलमध्ये महिलेचे खाजगी व्हिडीओ सापडल्यानंतर चोराने ते व्हायरल करण्याची धमकी दिली आणि लाखो रुपयांची मागणी केली. या प्रकरणी आता पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोबाईलच्या मालकासोबत चोरट्याने संपर्क साधला आणि म्हणाला, एक लाख रुपये दिले न दिल्यास मोबाईलमधील पत्नीचा […]
अधिक वाचा...
