Video: मोबाईल चोराला मिळाले पत्नीचे प्रायव्हेट व्हिडीओ अन् पुढे…

मुंबई : एका 25 वर्षीय डिलिव्हरी बॉयचा मोबाईल अज्ञात व्यक्तीने सुमारे महिनाभरापूर्वी चोरला होता. चोराला मोबाईलमध्ये महिलेचे खाजगी व्हिडीओ सापडल्यानंतर चोराने ते व्हायरल करण्याची धमकी दिली आणि लाखो रुपयांची मागणी केली. या प्रकरणी आता पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोबाईलच्या मालकासोबत चोरट्याने संपर्क साधला आणि म्हणाला, एक लाख रुपये दिले न दिल्यास मोबाईलमधील पत्नीचा […]

अधिक वाचा...

मुंबई पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर; कारण…

मुंबई : मुंबईच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला एक धमकीचा मेसेज आला असून, मुंबईमध्ये मोठा बॉम्ब धमाका होणार असल्याचे अज्ञात व्यक्तीने म्हटले आहे. मुंबईत सहा ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याचेही या मेसेजमध्ये म्हटले आहे. धमकीचा मेसेज मिळताच मुंबई पोलिसांसह इतर सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत, या धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस त्याचा शोध […]

अधिक वाचा...

मुंबई पोलिस दलातील पोलिसकाकाने घेतला टोकाचा निर्णय…

मुंबई : मुंबई पोलिस दलातील कॉन्स्टेबलने टोकाचा निर्णय घेतला आहे. कैलास एकनाथ गवळी (वय ३९) यांनी नागपाडा पोलिस रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून रविवारी (ता. १४) सकाळी 8.30 च्या सुमारास जगाचा निरोप घेतला. नैराश्येतून त्यांनी टोकाचा निर्णय घेतला उचललल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. कैलास एकनाथ गवळी यांना जवळच्या जेजे […]

अधिक वाचा...

मुंबई पोलिसकाकाचा चाळीसगावात क्रिकेटच्या वादातून खून…

जळगाव: मुंबई पोलिस दलात कर्मचारी असलेले शुभम अर्जुन आगोणे (वय २८ रा. चाळीसगाव) यांचा क्रिकेट स्पर्धेच्या वादातून धारदार तलवारीने वार करुन खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे चाळीसगाव तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून चार संशयितांना अटक करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. चाळीसगाव शहरात क्रिकेटचे सामने खेळले जात आहे. या […]

अधिक वाचा...

मुंबई पोलिसांच्या बनावट वेबसाईटप्रकरणी गुन्हा दाखल; बनावट वेबसाइट कशी ओळखाल…

मुंबई : मुंबई पोलिसांच्या संकेतस्थळा सारखे दिसणार हुबेहूब संकेतस्थळ सायबर गुन्हेगारांनी तयार केले होते. ट्विटरवरून करण्यात आलेल्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पोलिसांकडे तक्रार करणाऱ्या तक्रारदाराला त्याची ओळख अपलोड करण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी तगादा लावला होता. अन्यथा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती. तक्रारदाराने चौकशी केली असता वेबसाईट बनावट असल्याचे उघड झाले आहे. […]

अधिक वाचा...

मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला आला धमकीचा फोन…

मुंबईः मुंबई पोलिसांना मंगळवारी (ता. २१) रात्री पुन्हा एकदा धमकीचा फोन आला असून, मुंबईत मोठा घातपात होणार असल्याची फोनवरुन माहिती दिली आहे. दक्षिण मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला पुन्हा एकदा धमकीचा फोन आला आहे. एका व्यक्तीने फोनवर माहिती दिली की, ‘मुंबईत मोठा कांड होणार आहे’. मुंबई पोलिसांना यापूर्वीही असे धमकीचे फोन आले होते, यावेळी 26/11 हल्ल्याची […]

अधिक वाचा...

पोलिसकाकाने मैत्रिणीसोबत झालेल्या भांडणानंतर केली आत्महत्या…

मुंबईः मैत्रिणी सोबत झालेल्या भांडणातून पोलिस कॉन्स्टेबलने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वरळी पोलिस वसाहत येथे घडली आहे. इंद्रजित साळुंखे असे या पोलिस कॉन्स्टेबलचे नाव आहे. दोन वर्षापूर्वी मुंबई पोलिस दलात भरती झालेला इंद्रजित साळुंखे हा नायगाव मुख्यालय येथील शस्त्रास्त्र विभागात तैनात होता. इंद्रजित साळुंखे याचे गोरेगाव येथे राहणाऱ्या एका युवती सोबत प्रेमप्रकरण सुरू होते. इंद्रजित […]

अधिक वाचा...

ड्रग्ज माफिया ललित पाटील याला पकडण्यात पोलिसांना यश; कसा अडकला पाहा…

मुंबई : ड्रग्ज माफिया ललित पाटील याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. मुंबई पोलिसांनी ललित पाटील याच्या चेन्नईत मुसक्या आवळल्या आहेत. मुंबई साकीनाका पोलिसांनी ही कारवाई केली. ललित पाटील हा आंतरराष्ट्रीय पातळीवर चालणाऱ्या मोठ्या ड्रग सिंडिकेटचा आहे. ड्रग सिंडिकेट त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. पण, ललित पाटील याने एक चूक केली आणि तो पोलिसांच्या जाळ्यात […]

अधिक वाचा...

मुंबई पोलिस दलात तीन हजार कंत्राटी पोलिसांची भरती; गृह खात्याचा निर्णय…

मुंबईः मुंबई पोलिस दलात तीन हजार कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृह खात्याने घेतला आहे. राज्य सुरक्षा महामंडळामार्फत कंत्राटी पद्धतीने जास्तीत जास्त 11 महिन्यांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांकडे मनुष्यबळाची तीव्र टंचाई असून, नवीन भरती होईपर्यंत पोलिस आयुक्तांच्या विनंतीवरून गृह विभागाने हा निर्णय घेतला आहे. या कंत्राटी पोलिसांच्या पगारासाठी 30 कोटी रुपये खर्चासही […]

अधिक वाचा...

मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा फोन…

मुंबई : मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला पुन्हा एकदा धमकीचा फोन आला आहे. संबंधित व्यक्तीने पोलिसांना फोन करून मुंबईत ट्रेनमध्ये सीरियल बॉम्बस्फोट होणार असल्याचे म्हटले आहे. मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला आज (रविवार) सकाळी हा कॉल आल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने फोनवर माहिती दिली की, मुंबईत ट्रेनमध्ये सीरियल बॉम्बस्फोट होणार आहे. जुलै […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!