राजधानीत युवकाला १७वेळा चाकूने भोकसलं; घटना CCTV मध्ये कैद…
नवी दिल्ली : राजधानीत रस्त्यातच युवकावर चाकूने हल्ला करण्यात आला असून, तब्बल १७वेळा चाकूने भोकसले. युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. CCTV कॅमेऱ्यात कैद झालेल्या घटनेच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, रस्त्याच्या कडेला दोन युवक बोलत होते. एक युवक बसलेला तर दुसरा उभा आहे. अचानक तिथे तिसरा एक व्यक्ती येतो. तिसरा […]
अधिक वाचा...Video: आईस्क्रीममध्ये बोटानंतर सापडली गोम…
नवी दिल्ली : मुंबईमध्ये एक महिला आईस्क्रीम खात असताना माणसाचं बोट सापडली होती. दुसऱ्या घटनेत आईस्क्रीममध्ये गोम सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अमूल कंपनीच्या आईस्क्रीमच्या डब्यामध्ये गोम सापडल्याचा दावा एका महिलेने केला असून, याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुंबईतील मालाडमध्ये आईस्क्रीमच्या कोनमध्ये माणसाचं बोट सापडल्यानंतर […]
अधिक वाचा...प्रेमापोटी मेव्हणीला दिला महागडा मोबाईल गिफ्ट अन् पुढे…
नवी दिल्ली : एकाने आपल्या मेव्हणीला महागडा मोबाईल गिफ्ट दिला होता. पण, मेव्हण्याच्या या भेटवस्तूमुळे पोलिस थेट भावजींच्या घरी पोहोचले आणि त्याला अटक करून, त्याची रवानगी तुरुंगात केली. विमानात दागिने चोरी झाल्याचे एक प्रकरण नुकतेच घडले. या प्रकरणात आरोपीला अटक केल्यानंतर अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या असून, पोलिस सखोल तपास करत आहेत. आरोपीने हे दागिने विकून […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! बेबी केअर सेंटरला भीषण आग, 7 नवजात बाळांचा होरपळून मृत्यू…
नवी दिल्ली : दिल्लीच्या विवेक विहार परिसरात एका बेबी केअर सेंटरमध्ये शनिवारी (ता. २५) रात्री उशिरा भीषण आग लागली. या आगीत ७ नवजात बाळांचा होरपळून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. दिल्लीत रात्री साडे अकराच्या सुमारास अग्निशमन दलाच्या कार्यालयात फोन आला. विवेक विहार परिसरात आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. […]
अधिक वाचा...त्रिकोणी प्रेमकथा! मुलीचे एकाच वेळी दोघांशी प्रेमसंबध अन् पुढे…
नवी दिल्ली : नवी दिल्लीच्या इंडिया गेटजवळ एका व्यक्तीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. प्रेमप्रकरणातून हत्या झाल्याची माहिती पुढे आली असून, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. प्रभाकर (वय २५, रा. संगम विहार, मुळ रा. इटावा, उत्तर प्रदेश)असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. नवी दिल्लीतील इंडिया गेटच्या जवळ रात्रीच्या सुमारास एका आईस्क्रिम विक्रेत्याची हत्या करण्यात आली. […]
अधिक वाचा...विमानतळावर तपासणी करतानाच परदेशी महिलेच्या अंडरगारमेंटमध्ये…
नवी दिल्ली : दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक परदेशी महिला सुरक्षा तपासणीदरम्यान अडकली आहे. सीआयएसएफ महिला सुरक्षा अधिकाऱ्याचा हात परदेशी महिलेच्या कमरेच्या खाली येताच, हँड हेल्ड मेटल डिटेक्टर (एचएचएमडी) चा अलार्म जोराने वाजू लागला आणि चोरी उघड झाली. पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! महिलेची तपासणी करत असतानाच बीपचा आवाज […]
अधिक वाचा...Video : बिकिनी घालून युवती चढली बसमध्ये चढते तेंव्हा…
नवी दिल्ली : राजधानी मधील डीटीसी बसमध्ये बिकिनीमध्ये प्रवास करणाऱ्या एका युवतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. काही जणांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याची मागणी केली आहे. एक युवती बिकिनी घालून गर्दीच्या बसमध्ये चढल्यानंतर प्रवाशांची अवस्था पाहण्यासारखी झाली आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावरही खूप वेगाने व्हायरल होत […]
अधिक वाचा...लहान मुलांच्या चोरीचे रॅकेट उद्ध्वस्त; आठ नवजात बाळांची सुटका…
नवी दिल्ली : केंद्रीय तपास संस्था सीबीआयने राजधानीत लहान मुलांची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून, आठ नवजात बाळांची सुटका केली आहे. सीबीआयने इतर राज्यांमध्येही पथके रवाना केली आहेत. सीबीआयने केलेल्या कारवाईत चार आरोपींना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. सीबीआयकडून याप्रकरणी औपचारिक खुलास करण्यात आला आहे. सध्या आरोपींची चौकशी सुरू आहे. नवजात बाळांसह […]
अधिक वाचा...भाजपच्या वर्षा पवार यांचा मृतदेह आढळल्याने उडाली खळबळ…
नवी दिल्लीः दिल्लीत भाजपच्या महिला कार्यकर्ता वर्षा पवार (वय 28) यांचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. वर्षा पवार या 24 फेब्रुवारीपासून बेपत्ता होत्या. दिल्लीमधीलच एका प्लेस्कूलमध्ये मृतदेह सापडला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षा पवार यांचे नरेला येथील स्वतंत्र नगर भागात वास्तव्य होते. वडील विजय कुमार यांनी पोलीस ठाण्यात बेपत्ता […]
अधिक वाचा...Video: कारखान्यात भीषण आग, 11 मजुरांचा होरपळून मृत्यू…
नवी दिल्ली : उत्तर दिल्लीतील अलीपूर भागातील दयाल मार्केटमधील एका पेंट फॅक्टरीत आग लागून 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. यासोबतच चार जण जखमी झाले आहेत. दुर्घटनेतील जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दिल्लीतल्या अलीपूरमध्ये ही घटना घडली आहे. मृतांची ओळख अद्याप पटली नसल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. मार्केटमध्ये गुरुवारी (ता. १५) सायंकाळी […]
अधिक वाचा...
