Video: पुण्यात ‘मुळशी पॅटर्न’ थरार! मैत्रिणीला फोन लावण्यावरुन सपासप वार…
पुणे: पुणे शहरातील भारती विद्यापीठ परिसरात दोन जिवलग मित्रांमध्ये जुन्या मैत्रिणीला फोन लावण्यावरून वाद झाला, या वादातून कोयत्याने वार केल्याने दुसरा मित्र गंभीर जखमी झाला आहे. 2 फेब्रुवारीला रात्री आठ वाजता ही घटना घडली असून, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन आरोपीवर गुन्हा […]
अधिक वाचा...युवकाने आत्महत्येसाठी केलेले दृश्य पाहून पोलिसही हादरले…
मुंबई : मिरा रोड येथील कनकीया परिसरात राहणाऱ्या एका युवकाने राहत्या घरात गॅसचा पाइप तोंडात धरून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. करण दीपक कपाडिया असे मृत युवकाचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, करणने स्वयंपाकाच्या गॅसचा पाइप तोंडात धरून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्याला तातडीने […]
अधिक वाचा...पुणे! प्रियकराला संपवलं पण सिग्रेट अन् दारुच्या बाटलीने अडकवलं…
पुणे: प्रियकराच्या सततच्या त्रासाला कंटाळून प्रेयसीने आपला मुलगा आणि त्याच्या मित्राच्या मदतीने प्रियकराची हत्या केल्याची घटना चाकण परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणात उत्तर चाकण पोलिसांनी तब्बल 20 दिवसांच्या तपासानंतर तिघा आरोपींना अटक केली असून, दारूच्या बाटल्या आणि सिगारेटच्या आधारे गुन्ह्याचा उलगडा केला आहे. मुंजा धोंडीबा नरहरे (वय 25) याचे उषा नानासाहेब चव्हाण (वय 40) […]
अधिक वाचा...लोणावळा! अखेर श्रेयाच्या मृत्यूचं गुढ उकललं, तपासात धक्कादायक वळण…
लोणावळा (पुणे): लोणावळ्यातील टायगर पॉईंटच्या 400 फूट खोल दरीत युवतीचा मृतदेह आढळून आला आहे. श्रेया नरेंद्र पटी (वय १९, रा. मुंबई) असे या युवतीचे नाव असून तिच्या मृत्यूने अनेक प्रश्न उपस्थित होत होते. अपघात नसून ती आत्महत्या असल्याचं आता स्पष्ट झाले आहे. मुंबईहून ट्रेकिंगचं निमित्त सांगून आलेल्या श्रेयाने इतकं टोकाचं पाऊल का उचललं, याचा शोध […]
अधिक वाचा...सरपंचपदाची निवडणूक लढवण्यासाठी बापाने घेतला चिमुकलीचा बळी…
नांदेड : सरपंचपदाची निवडणूक लढण्यासाठी एका जन्मदात्या बापाने आपल्या सात वर्षाच्या मुलीला तेलगंणा राज्यात नेऊन कॅनॉलमध्ये फेकून देऊन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तेलंगणा राज्यातील पोलिसांनी मुखेड तालुक्यातील रहिवासी असलेल्या आरोपी पांडुरंग कोंडामंगले या बापाला ताब्यात घेतले आहे. पांडुरंग कोंडामंगले (वय 32) याला गावातील सरपंचपदाची निवडणूक लढवायची होती. मात्र, महाराष्ट्रात […]
अधिक वाचा...अजितदादांच्या अंत्यसंस्कारावेळी लाखो रुपयांची चोरी; 7 चोरट्यांना अटक…
पुणे : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बारामती येथे अंत्यसंस्कारासाठी मोठी गर्दी झाली होती. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नेते, कार्यकर्ते बारामतीत आले होते. मात्र, अंत्यसंस्कारावेळीच्या गर्दीचा गैरफायदा घेत काही चोरट्यांनी उपस्थित नागरिकांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्या व रोख रक्कम चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. बारामतीमध्ये अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होत असताना गर्दीतील वेगवेगळ्या ठिकाणी कार्यकर्ते आणि […]
अधिक वाचा...नाशिक पोलिस दलातील बडतर्फ पोलिसाचा लॉजवर संशयास्पद मृत्यू…
नाशिक: सराईत गुन्हेगारांसह अमली पदार्थ बाळगणाऱ्यांच्या संपर्कात असल्याने सात महिन्यांपूर्वी नाशिक शहर पोलिस दलातून बडतर्फ केलेल्या तत्कालीन पोलिस कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. इरफान मन्सूर शेख (वय ३५, रा. वडाळागाव) असे मृताचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. इरफानने आत्महत्या केली, की नशेच्या ‘ओव्हर डोस’ मुळे त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला यासंदर्भातील तपास सुरू आहे. […]
अधिक वाचा...बीडच्या माजी सरपंचाचा तामिळनाडूमध्ये प्रताप; पोलिसांनी ठोकल्या बेड्या…
बीड: बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील एका माजी सरपंचाने आणि कृषी पंप व्यापाऱ्याने तामिळनाडू राज्यात बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न केला आहे. तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील थुवाकुडी पोलिसांनी या दोघांना अटक करत तब्बल 8 लाख 37 हजार 800 रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. पुढील तपास आता तामिळनाडू गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) सोपवण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या […]
अधिक वाचा...पुणे पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने हॉटेलचे लॉक तोडले अन् झाले अवाक…
पुणे : पुणे शहरातील स्वारगेट परिसरात असलेल्या एका हॉटेलमधील धक्कादायक प्रकार उघडकीस आला. बाहेरून हॉटेलला कुलूप, आत अंधार. पण जेव्हा पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने शटरचे लॉक तोडले, तेव्हा आतलं दृश्य पाहून पोलिसही चक्रावले. ‘एलडिनेरो’ हॉटेलच्या नावाखाली सुरू असलेल्या एका व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. स्वारगेटमधील लक्ष्मीनारायण चौकातील ‘मोदी प्लाझा’ इमारतीत ‘एलडिनेरो’ हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये […]
अधिक वाचा...प्रेमविवाहानंतर दाजीला हॉटेलमध्ये जेवण करत असतानाच संपवलं…
सोलापूर: बार्शी तालुक्यात प्रेमविवाहाला विरोध करीत मेहुण्याने दाजीची हत्या केल्याची घटना 28 जानेवारी रोजी सायंकाळी साडेआठच्या सुमारास घडली आहे. या घटनेत सुशील क्षीरसागर असे मृत्यू झालेल्या दाजीचे नाव असून, ऋषिकेश क्षीरसागर असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशील क्षीरसागर आणि ऋषिकेशची बहीण रेश्मा यांचा एक वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. मात्र घरातील काही सदस्यांना हा […]
अधिक वाचा...
