राज्य सरकारकडून अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीचे आदेश…
मुंबईः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी (ता. 28) बारामती जवळ विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे. अजित पवार यांच्या निधनाने राज्यभर शोककळा पसरली असून तीन दिवस शासकीय दु:खवटा पाळण्यात आला आहे. राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमानाच्या अपघाताचे सीआयडी चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. त्याचबरोबर बारामती पोलीसांना अपघातस्थळावर कोणालाही जाऊ न देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या […]
अधिक वाचा...ओंकारने आलोक सिंह यांना भोसकण्याचं कारण आलं पुढं…
मुंबई : मालाड रेल्वे स्थानकात ट्रेनमध्ये धक्का लागल्याच्या रागातून आलोक सिंह (वय 31) या प्राध्यापकाचा पोटात धारदार शस्त्र भोसकून खून करण्यात आला होता. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी ओंकार शिंदे या तरुणाला अटक केली होती. पोलिस तपासादरम्यान आलोक सिंह यांना भोसकण्याचं कारण पुढे आले आहे. आलोक सिंह आणि ओंकार शिंदे यांच्यात मालाड स्थानकात ट्रेनमधून उतरताना वाद झाला […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये हिट अँड रनचा थरार, बड्या बापाच्या मुलानं दोघांना उडवलं…
नाशिक: पुणे येथील पोर्श कार अपघाताची आठवण करून देणारी घटना गंगापूर रोड परिसरात घडली आहे. एका भरधाव चारचाकी गाडीने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. धक्कादायक म्हणजे ही कार चालवणारा चालक अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले आहे. युवक दुचाकीवरून जात असताना, पाठीमागून येणाऱ्या एका […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! एक नवविवाहित तर दुसऱ्या बहिणाचा विवाहापूर्वी अपघाती मृत्यू…
नागपूर : नागपूर-भंडारा महामार्गावर महालगावजवळ नाग नदीच्या पुलावर झालेल्या भीषण अपघातात दोन मामे बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अलिशा मेहर आणि मोनाली घाटोळे अशी मृत नवविवाहित युवतींची नावे आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. आनंदाच्या कार्यक्रमाला निघालेल्या दोघींवर काळाने अचानक घाव घातल्याने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अलिशा मेहर […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात लिव्ह-इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या पत्नीची हत्या…
पुणे : पत्नी दुसऱ्या व्यक्तीसोबत राहत असल्याच्या रागातून पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील वाडेबोल्हाई परिसरात घडली आहे. दागिन्यांच्या देवाणघेवाणीच्या बहाण्याने पतीने पत्नीला भेटायला बोलावले आणि तिथेच तिचा काटा काढला. या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत. नम्रता शैलेंद्र व्हटकर (वय १९) असे मृत विवाहितेचे नाव आहे. शैलेंद्र […]
अधिक वाचा...पाणबुडी मोटर व म्हशी चोरी करणाऱ्या संघटित टोळीचा पर्दाफाश…
लातूर (श्रीकांत मुंडे): लातूर जिल्ह्यात शेतशिवारातील पाणबुडी मोटारी, स्प्रिंकलर सेट, म्हशी तसेच परवाना असलेल्या हॉटेल व बिअर बार फोडून विदेशी दारू चोरी करणाऱ्या संघटित टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी अत्यंत नियोजनबद्ध व धाडसी कारवाई केली आहे. या कारवाईत चार सराईत आरोपींना अटक करून तब्बल ९,२६,२४०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक अमोल […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! पत्नीला वाढदिवशीच समजली प्राध्यापक पतीच्या मृत्यूची बातमी…
मुंबईः मुंबईच्या पश्चिम रेल्वेमार्गावरील मालाड स्थानकात शनिवारी संध्याकाळी आलोक सिंह (वय 31) या प्राध्यापकाचा पोटात चिमटा खुपसून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आलोक सिंह यांची पत्नी पूजा यांना वाढदिवशीच पतीच्या मृत्यूची बातमी समजल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ओंकार एकनाथ शिंदे (वय 27) याने आलोक सिंह यांच्या पोटात चिमटा खुपसला होता आणि […]
अधिक वाचा...अभिनेता कमाल आर खान याला ओशिवरा पोलिसांनी केली अटक…
मुंबई : मुंबईतील ओशिवारा परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणी अभिनेता कमाल आर खान याला ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. 18 जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ओशिवारातील नालंदा इमारतीत गोळीबार झाल्याची घटना समोर आली होती. विशेष म्हणजे हा गोळीबार एका मॉडेल आणि एका लेखकाच्या घराच्या दिशेने करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. मुंबईतील ओशिवारातील नालंदा […]
अधिक वाचा...दोन हजारांच्या नोटांनी भरलेले कंटेनर गेला चोरीला अन् युवकाचे अपहरण…
नाशिक: कर्नाटकातील चोरली घाट परिसरात तब्बल 400 कोटी रुपयांच्या रोख रकमेचा कंटेनर चोरीला गेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या संशयातून नाशिकमधील संदीप पाटील या युवकाचे अपहरण करून त्याला मारहाण व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली असून, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता विशेष […]
अधिक वाचा...नागपूर! प्रेयसीचा OYO हॉटेलमध्ये गळा चिरून हत्या…
नागपूर : नागपूरच्या फेटरी परिसरात असलेल्या एका OYO हॉटेलमध्ये प्रेयसीचा गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे नागपूरसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. रुचिता भांगे (वय 22) असे मृत युवतीचे नाव आहे. आरोपी प्रियकराचे नाव सौरव जामगडे असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुचिता आणि सौरव हे […]
अधिक वाचा...
